‘डार्क मोड’ सह ‘WhatsApp’ देणार ‘हे’ नवीन फिचर्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – व्हॉट्सअ‍ॅप मध्ये अनेक नवीन फीचर्स आले आहेत. हे फीचर्स iOS युजर्ससाठी आहेत. म्हणजेच हे फीचर्स आयफोन आणि आयपॅडमध्ये मिळणार आहे. हे नवीन फीचर्स Version 2.19.100 मध्ये असतील. आता युजर्स मीडिया फाईल्स एडिट करून चॅटमधूनच सेंड करू शकणार आहेत.

या अपडेटनंतर नोटीफिकेशन्समधून डायरेक्ट ऑडिओ क्लीप ऐकता येणार आहे. आयफोन युजर्स व्हॉट्सअ‍ॅप कॅमेऱ्याच्या फॉन्ट स्टाईलला बदलू शकणार आहेत. यासाठी टी (T) आयकॉन टॅप करावा लागणार आहे. एका रिपोर्टनुसार, WhatsApp मध्ये लवकरच वेगवेगळे मोड्स येणार आहेत. यात डार्क मोडचाही समावेश असणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हे ब्लू शेडमध्ये असेल आणि पूर्णपणे डार्क नसेल. कंपनीने अँड्रॉईडसाठी 2.19.275 व्हर्जन अपडेट सबमिट केलं आहे.

अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप एक खास फीचर टेस्टिंग करत आहे. यात मेसेज काही ठराविक काळानंतर आपोआप गायब होणार आहेत. असे फीचर याआधी अनेक इन्स्टंट मेसेंजिग अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहेत. फेसबुक मेसेंजरच्या सिक्रेट मोडमध्येही हे फीचर देण्यात आलं आहे. यात समोरच्याने आपला मेसेज वाचल्यानंतर तो आपोआप गायब होतो. यात तुम्ही टायमरही सेट करू शकता.

Disappear Message हे फीचर सुरुवातीला ग्रुप चॅटला दिलं जाणार आहे. यात सेटींगमध्ये तुम्हाला 5 सेकंदापासून ते 1 तासांपर्यंत टाईम ऑप्शन मिळणार आहे. हे पूर्ण चॅटसाठी असणार आहे. एखाद्या विशिष्ट मेसेजसाठी नसेल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण