Whatsapp New Group Voice Call Feature | व्हॉट्सअप ‘ग्रुप व्हॉईस कॉल’मध्ये 32 लोकांना सहभागी होण्याची देणार परवानगी, मोठ्या फाईल्स करता येतील शेअर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Whatsapp New Group Voice Call Feature | व्हॉट्सअपने म्हटले की, ते ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये 32 लोकांना एकाचवेळी सहभागी होणे आणि दोन गीगाबाईटपर्यंत फाईल शेयर करण्याची सुविधा देत आहेत.

 

याशिवाय व्हॉट्सअपने आणखी अनेक सुविधा देण्याबाबत म्हटले आहे. सध्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करून केवळ ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये केवळ आठ लोकांना सहभागी होता येते, आणि यूजर्समध्ये शेयर करण्यात येणार्‍या फाईलचा आकार 1 जीबीपेक्षा जास्त असू नये.

 

व्हॉट्सअप चॅट ग्रुपच्या अ‍ॅडमिनला (WhatsApp Group Admin) कोणत्याही वेळी मेसेज हटवण्याची परवानगीसुद्धा देईल.
कंपनी प्रवक्त्याने म्हटले की, हटवलेले साहित्य ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला दिसणार नाही.
मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले, आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुपमध्ये नवीन फिचर देत आहोत,
ज्यामध्ये प्रतिक्रिया, मोठ्या फाइल शेयर करणे आणि मोठे ग्रुप कॉलिंग यांचा समावेश आहे.

 

Web Title :-  Whatsapp New Group Voice Call Feature | whatsapp will allow 32 people to join group voice calls can share large files

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा