WhatsApp ची नवी पॉलिसी आहे तरी काय? Accept न केल्यास उद्यापासून अनेक फिचर्स करणार नाहीत काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यातच WhatsApp, Facebook, Twitter आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा युजर्सही मोठा आहे. WhatsApp च्या युजर्सची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी नवंनवे फिचर्स आणण्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर आता WhatsApp कडून नवी पॉलिसी आणण्यात आली आहे. ते Accept केले नाही तर उद्यापासून अनेक फिचर्स काम करणार नाहीत.

WhatsApp ची नवी पॉलिसी उद्यापासून (15 मे) लागू केली जाणार आहे. सध्या कोणत्याही युजरचे अकाउंट डिलिट केले जाणार नाही. मात्र, पॉलिसी Accept केली नाही तर हळूहळू फिचर्स काम करणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

…तर हे फिचर्स होतील बंद

सध्या Limited Functionality Mode मध्ये अकाउंट जाऊ शकते. युजर्स चॅट लिस्ट एक्सेस करू शकणार नाही. मात्र, दुसऱ्या युजर्सला चॅट मिळेल. फक्त नोटिफिकेशनच्या माध्यमातून ते वाचू आणि रिप्लाय देऊ शकतील. युजर्स इन्कमिंग आणि आऊटगोईंग कॉल करू शकतील. मात्र, युजर्सने नियम आणि अटींचा स्वीकार केला नाही तर युजर ऑडियो किंवा व्हिडिओ कॉल करू शकतील की नाही, याची माहिती अद्याप दिली गेली नाही.

काय आहे WhatsApp ची नवीन पॉलिसी?

WhatsApp युजर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसिव्ह करतात कंपनी त्याचा वापर कुठंही करू शकते. कंपनी तो डाटा शेअरही करू शकते. यापूर्वी युजरने पॉलिसी Agree म्हटले नाही तर अकाउंटचा वापर करता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हे पर्यायी करण्यात आले.