WhatsApp युजर्स लक्षात ठेवा, ‘या’ बोगस मेसेजवर क्लिक केल्यास प्रचंड अडचणीत याल तुम्ही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या ऑफर्सचा फेक मेसेज फिरत आहे. ज्याद्वारे यूजर्सची फसवणूक होत आहे. नव्या वर्षाच्या नावाखाली यूजर्सच्या फोनवर New Year’s Virus ने अटॅक करुन जाळ्यात अडकवण्याचा प्रकार सुरु आहे. यात हॅकर्स ऑफरसाठी एक लिंकवर क्लिक करण्यास सांगतो आणि यूजर्सची फसवणूक होते.

लिंकवर क्लिक करण्यासाठी खरी वाटणारी फेक वेबसाइट सुरु होते. लिंक ओपन झाल्यावर हॅक होण्याचा धोका वाढतो. यात अनेक जाहिराती आहेत, ज्यांना सब्सक्राइब करण्यासाठी सांगितले जाते. यानंतर यूजर्सला त्यांचे पर्सनल डिटेल्स मागितले जातात. एका वृत्तानुसार या खोट्या मेसेजमध्ये अधिकतर ग्रीटिंग्ससंबंधित मेसेजस आहेत, ज्यावर क्लिक न करता हे मेसेज पाहता येत नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप जगप्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे आणि याचा फायदा घेत हॅकर यूजर्सची फसवणूक करतात.

पहिल्यांदाही व्हायरल झाले होते मेसेज –
हे काही पहिल्यांदा झालेले नाही, मागील महिन्यात आणि 2015 मध्ये देखील असेच मेसेज व्हायरल झाले होते. ज्या व्हॉट्सअ‍ॅपवर फ्री अ‍दिदास शुज देण्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय फेस्टिव्हल सेल दरम्यान हॅकर्सने फेक ऑफर्सच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर असे मेसेज पाठवले होते. मेसेजमध्ये अमेझॉन आणि फ्ल्पिकार्टच्या सेल ऑफर्सचे फेक मेसेज पाठवण्यात येत होते आणि एक खोटी लिंक पाठवण्यात येत होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/