‘WhatsApp’ची मोठी घोषणा : ३१ डिसेंबर नंतर ‘या’ फोनमध्ये ‘WhatsApp’ चालणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षाच्या शेवट पर्यंत विंडोज फोन मध्ये  व्हॅाट्सॲप काम करणार नाही. आता व्हॅाट्सॲप वापरणाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे. व्हॅाट्सॲप ने आपल्या ब्लॉग वर लिहिले आहे की, ३१ डिसेंबर २०१९ नंतर विंडोज फोन मध्ये व्हॅाट्सॲप चालणार नाही तसेच कंपनीने असे सांगितले आहे की, १ जुलै पासून विंडोज स्टोर मधून व्हॅाट्सॲप काढून टाकले जाईल. व्हॅाट्सॲप च्या अपडेटेड FAQ च्या मते, व्हॅाट्सॲप फेब्रुवारी २०२० नंतर अँड्रॉइड आणि  वापरणाऱ्या काही युजर्सच्या फोनमध्ये चालणार नाही.

व्हॅाट्सॲप कंपनीने आपल्या स्पोर्ट पेज FAQ वर सरळ सरळ लिहिले आहे की, अँड्रॉइड व्हर्जन २. ३. ७. आणि आधीच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काम करणार नाही. एवढेच नाही तर iOS 7 आणि त्याहून जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम वर चलणाऱ्या आयफोनमध्येही १ फेब्रुवारी २०२० नंतर व्हॅाट्सॲप चालणार नाही.

याचसोबत माहिती देताना कंपनीने असेही नमूद केले आहे की चालू काळात व्हॅाट्सॲप अँड्रॉइड ४. ०. ३ व्हर्जन नंतरच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करणार. आयफोनमध्ये iOS 8 नंतरच्या सगळ्या नसल्याने व्हर्जन मध्ये व्हॅाट्सॲप उपलब्ध असणार आहे. ॲक्टिव प्लॅटफॉर्म नसल्याने विंडोज फोन मध्ये व्हॅाट्सॲप कधीही बंद होण्याची शक्यता आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’