‘WhatsApp’ च्या ‘या’ नवीन फीचरमुळं होणार नको त्या ग्रुपपासुन सुटका, करावी लागेल फक्त ‘ही’ सेटिंग

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे ज्यामुळे युजर्सला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे की नाही हे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरमुळे आता युजर्सला नको असलेल्या मेसेजपासून आणि मिम्स पासून सुटका मिळेल.

व्हाट्सअ‍ॅपने हे नवीन फीचर प्रायव्हसी सेटिंगमध्ये ठेवले आहे. आपण काही कॉन्टॅक्ट नंबरला आपल्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापासून रोखू शकता. तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरला करण्यासाठी पर्सनलली रिक्वेस्ट लिंक पाठवावी लागेल. या लिंकच्या माध्यमातून युजरला ला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यासाठी तीन दिवसांचा अवधी मिळेल. या दरम्यान, रिक्वेस्ट अ‍ॅडक्सेप्ट न केल्यास या लिंकची व्हॅलिडिटी संपून जाईल.

असा करा फीचरचा वापर

व्हॉट्सअ‍ॅपच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट क्लिक करा
सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करा
प्रायव्हसीवर क्लिक करा
यानंतर तीन ऑप्शन्स दिसतील
यात Everyone, My contacts आणि My contacts except चे ऑप्शन असतील
My contacts except वर क्लिक करुन आपण आपल्याला कोणत्या ग्रुपमध्ये ऍड करावे हे आपण निवडू शकता.

Visit : Policenama.com