• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, July 1, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं…

    ताज्या बातम्या

    ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेताना महिला सहायक…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • टेक्नोलाॅजी
  • Explainer : तुमची वैयक्तिक माहिती WhatApp, Signal का Telegram वर सुरक्षित ?, जाणून घ्या

Explainer : तुमची वैयक्तिक माहिती WhatApp, Signal का Telegram वर सुरक्षित ?, जाणून घ्या

टेक्नोलाॅजी
On Jan 15, 2021
whatsapp-signal-telegram
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अगदी गेल्या आठवड्यापर्यंत तुम्ही डोळे झाकून व्हॉट्सॲप असं उत्तर दिलं असतं. पण अलीकडे त्यांचं गोपनीय माहितीचं धोरण बदललंय. म्हणजे तुमचे अगदी कामाचे मेसेजही कंपनी उघड करू शकते, अशी भीती निर्माण झालीय. त्यामुळे लोकं टेलिग्राम, सिग्नल अशा पर्यायी ॲपकडे वळत आहेत. व्हॉट्सॲपच्या बदललेल्या गोपनीयता धोरण हे 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. जर लोकांनी ही गोपनीयताविषयक धोरण स्वीकारले नाही तर त्यांचे व्हॉट्सॲप अकांऊट आपोआपच बंद होईल, असे व्हॉट्सॲपने सांगितले आहे. तसेच या बदललेल्या गोपनीयता धोरणा (Privacy Policy) नुसार व्हॉट्सॲप आपल्या युझर्सचा इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक ॲपला देऊ शकतो. यामुळे लोकं नाराज असून ते टेलिग्राम, सिग्नल अशा पर्यायी ॲपकडे वळत आहेत. यावर व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, ‘आम्ही गोपनीयता धोरण अद्यायावत केली होती. अद्यायावत धोरणानुसार अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, तसेच चुकीची माहिती पसरवली जात आहे.

याबाबत व्हॉट्सॲपने नुकतेच Tweet केलं आहे. त्यात कॉलिंग, प्रायव्हेट चॅट, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट आणि डेटाविषयीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. त्यात व्हॉट्सॲप लोकांच्या मेसेज आणि कॉलिंगचे रेकॉर्ड ठेवत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच युझर्सने शेअर केलेल्या लोकेशनचा तपशील ना व्हॉट्सॲप पाहू शकते ना त्याचा एक्सेस फेसबुककडे आहे. युझर्सने शेअर केलेला लोकेशनचा तपशील हा गुप्त राहतो. ग्रुप चॅटच्याबाबतही असेच असते, असे व्हॉट्सॲपने व्टिटमध्ये स्पष्ट केले. व्हॉट्सॲप लोकांचे कोणतेही कॉन्टॅक्ट कोठेही शेअर केले जात नसल्याचे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. तसेच नव्या गोपनीयता धोरणामध्ये लोकांचे व्हॉट्सॲप ग्रुप खाजगीच राहतील, तसेच लोकं अजूनही ग्रुप डिसअॅपीयरचे फिचर सेट करु शकतात. तसेच डाटा देखील डाऊनलोड करु शकतात. असे व्हाट्सपणे म्हटले आहे. गतवर्षी हे फिचर व्हॉट्सॲपने आणले होते. यानुसार 7 दिवसांनंतर कोणताही मेसेज आपोआपच डिलीट होत होता. यालाच त्यांनी डिसॲपीअर मेसेजिंग नाव दिलं गेलं. परंतु व्हॉट्सॲपने युझर्सला डेटा डाऊनलोड करण्यासाठी पर्याय देखील दिला आहे.

Tweet ला उत्तर देताना व्हॉट्सॲपने म्हटलं आहे की, कंपनीच्या गोपनीयता धोरणामुळे मित्र आणि कुटुंबीयांसोबत युझर्सने केलेल्या चॅटच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होत नाही. व्हॉट्सॲपने मागील आठवड्यात आपल्या नव्या गोपनीयता धोरणाविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की ह्या बदललेल्या वैयक्तिकरित्या व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांवर नवीन धोरणाचा कुठलाही परिणाम होणार नाही. फक्त ज्यांची बिझिनेस अकाऊंट आहेत, ती माहिती वितरित केली जाईल. या अद्यायावत धोरणामध्ये कोणते बदल होणार आहे ते नमुद करण्यात आले असून त्यात एखाद्या व्यवसायाविषयी मेसेज पाठवणे, जे की ऑप्शनल आहे. तसंच त्यात डेटा कसा वापरायचा आणि एकत्रित करायचा हे स्पष्ट केले आहे.

खासगी आणि सुरक्षित मेसेजिंग विषयी –
लोकं आपल्या मित्रांना, कुटुंबातील सदस्य तसेच सहकाऱ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवतात किंवा त्यांच्याशी कॉल्सवर संवाद साधतात. मात्र हे मेसेज व्हॉट्सॲप किंवा फेसबुक वाचू शकत नाही. तसेच कॉल्सही ऐकू शकत नाही. व्हॉट्सॲपच्या म्हणण्यानुसार, लोकं व्हॉट्सॲपवर मित्र किंवा नातेवाईक तसेच सहकाऱ्यांसोबत जे काही शेअऱ करतो ते त्यांच्यापुरतेच खाजगी आणि सुरक्षित राहील. कारण युझर्सचे खाजगी मेसेज एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमुळे सुरक्षित राहतात.व्हॉट्सॲप एन्क्रिप्शनला अधिक महत्व देतो. त्यामुळे प्रत्येक मेसेजवर असलेले एन्क्रिप्शनचे लेबल युझर्स पाहू शकतात.

व्हॉट्सॲप कॉल्स, मेसेज याचे रेकॉर्ड ठेवत नाही –
जर व्हॉट्सॲपने 200 कोटी लोकांचे रेकॉर्ड ठेवल्यास प्रायव्हसी आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणून व्हॉट्सॲप कोणतेही रेकॉर्ड ठेवत नाही

फेसबुक, व्हॉट्सॲपवरचे लोकेशन बघू शकत नाही –
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनमुळे अर्थातच की लोंकानी शेअर केलेले लोकेशन हे फक्त त्याने ज्यांच्या सोबत शेअर केले आहे, त्याच व्यक्ती बघू शकतात अन्य कोणीही नाही. त्यामुळे सुरक्षित होते.

फेसबुकवरून कॉन्टॅक्ट लिस्ट शेअर केली जात नाही –
त्या वापरकर्त्याने परवानगी दिल्यानंतरच व्हॉट्सॲप फोनच्या अॅड्रेस बुकमधील फक्त फोन क्रमांकच अॅक्सेस करतो. एकमेकांशी सहजपणे संवाद साधता यावा, यासाठी हा अॅक्सेस केला जातो. व्हॉट्सॲप अशी माहिती फेसबुक अॅपसोबत शेअर करीत नाही

व्हॉट्सॲप ग्रुप खासगी आणि सुरक्षित –
व्हॉट्सॲप मेसेजेस पाठवण्यासाठी आणि आपली सेवा स्पॅमपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रुप मेंबरशिपचा वापर केला जातो. व्हॉट्सॲप हा डेटा फेसबुकसोबत शेअर करीत नाही. या खाजगी मेसेज आणि सवांद असल्यामुळे व्हॉट्सॲपला यामधील काही कळू शकत नाही.

युझर्स ॲपमध्ये डाटा डाऊनलोडद्वारे मेसेंज आपोआप गायब होणे शक्य –
अधिक सुरक्षेसाठी उपयुक्त कोणताही मेसेज पाठवल्यानंतर तो 7 दिवसांनी गायब होण्याचा मार्ग निवडू शकतात. युझर्स ॲपमध्ये डाटा डाऊनलोड करुन पाहू शकता.

व्हॉट्सॲप, सिग्नल, टेलिग्राम, डेटा वापर –
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन – व्हॉट्सॲप लोंकांचे मेसेज ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आहे. तसेच सिग्नलमध्ये ही चॅट, मेसेज एन्क्रिप्टेड असते. टेलिग्राम ॲप मध्ये फक्त खासगी चॅट आणि सर्व चॅट एन्क्रिप्टेड.

डिसॲपरिंग मेसेजेस (अदृश्य संदेश) – व्हॉट्सॲपमध्ये संदेश अदृश्य करण्याची सुविधा आहे. अशीच सुविधा टेलिग्राम आणि सिग्नलमध्येआहे.

चॅट बॅकअप – व्हॉट्सॲपमध्ये चॅट बॅकअपचा पर्याय उपलब्ध आहे. पण तो दुसऱ्या ॲपवर अवलंबून आहे. सिग्नल ॲपमध्ये चॅट बॅकअप नाही. मध्ये लोकल टाईसवर चॅटस स्टोअर होते. टेलिग्राममध्ये चॅट बॅकअपचा पर्याय उपलब्ध आहे परंतु तो टेलिग्राम क्लाऊडवरच उपलब्ध होतो.

स्क्रिन लाॅक – व्हॉट्सॲपमध्ये हे फिचर उपलब्ध आहे. टेलिग्राम, सिग्नलमध्ये हे फिचर उपलब्ध नाही.

ॲडव्हरटाईजमेंट ( जाहिरात) – व्हॉट्सॲप, सिग्नलवरहा पर्याय नाही. मात्र टेलिग्रामवर लवकरच येण्याची शक्यता आहे.

ग्रुप चॅट सिक्युरिटी (सुरक्षितता) – व्हॉट्सॲपमध्ये ही सुविधा आहे. पण ती एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे. सिग्नलमध्ये ही सुविधा एकसारखी काम करते तर टेलिग्राममध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.

व्हिडीओ, व्हॉईस कॉल्स – व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि सिग्नलमध्ये सर्वच आहेत

callingcontactDatafacebookGroup ChatinstagraminternetPrivacy Policy
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

US : 16 व्या वर्षीच बनला बाप, नवजात मुलीला कडाक्याच्या थंडीत सोडलं अन् डोक्यात घातल्या गोळया

Next Post

Lasalgaon News : कांदानगरीच्या चुरशीच्या लढतीत 66.03 % मतदान




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

ED Inquiry | घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांच्या…

ताज्या बातम्या

Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांच्या…

ताज्या बातम्या

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे…

Latest Updates..

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा…

Jun 30, 2022

ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख…

Jun 30, 2022

LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी…

Jun 30, 2022

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक,…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या…

Jun 30, 2022

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | पक्षाध्यक्षांच्या सूचनेनंतर देवेंद्र…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी…

Jun 30, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने…

nagesh123 Jun 30, 2022

This Week

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत…

Jun 29, 2022

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा…

Jun 29, 2022

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ?…

Jun 30, 2022

ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच…

Jun 30, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता…

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही मुलासाठी बनवू शकता 8.5 लाखांचा फंड

Jun 30, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.