फ्रॉडचं आता नो-टेन्शन ! WhatsApp होणार अधिक सुरक्षित, लवकरच येणार ‘हे’ दमदार नवं फीचर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तंत्रज्ञानाच्या या युगात हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधून काढत आहेत. आता सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग ॲप Whatsapp वर लोकांचे अकाउंट हॅक करत आहेत. त्यामुळे एक छोटीसी चूक देखील महागात पडू शकते. अकाऊंटचा ॲक्सेस मिळवण्यासाठी हे मेसेज सायबर गुन्हेगारांकडून पाठवले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला फोन बदलते, त्यावेळी व्हॉट्सॲपकडून 6 अंकी कोड पाठविला जातो. त्यामुळे दुसऱ्या फोनमध्ये अॅक्सेस मिळतो. अशाच फसवणुकीपासून वाचण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. काय आहे हे नवीन फीचर, याच्या मदतीने तुम्हाला अकाउंट घोटाळ्यापासून कसे सुरक्षित ठेवता येईल, जाणून घ्या सविस्तर.
युझर्सची मंजुरी आवश्यक असेल
व्हॉट्सॲपने नुकतेच फ्लॅश कॉल (Flash Call) नावाच्या फीचरवर काम सुरु केले आहे. ज्यामध्ये व्हॉट्सॲपवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यावर युजर्सना त्यांचा फोन नंबर व्हेरिफाय करण्याची परवानगी मिळणार आहे. या फीचरमध्ये फोनच्या कॉल लॉगमध्ये प्रवेश करण्यासाठी युझर्सची मंजूरी आवश्यक आहे. असे केल्यानंतर व्हॉट्सॲप अकाउंटवर प्रवेश देण्यासाठी कॉल घेतला तर ते आपोआप सत्यापित होईल. हे नवं फिचर ॲपच्या अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.21.11.7 वर पाहिले आहे. अहवालात दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, फ्लॅश कॉल एक पर्यायी वैशिष्ट्य असेल, जे युजर्स त्यांच्या आवडीनुसार वापरु शकतील. यात युजर्सना फ्लॅश कॉलसाठी त्यांच्या कॉल लॉगवर व्हॉट्सॲपला ॲक्सेस द्यायचा आहे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल.
फ्लॅश कॉल एक उपयुक्त फीचर
एकुणच, फ्लॅश कॉल एक चांगले फीचर आहे. व्हॉट्सॲपने स्वत:च अशा फसवणूकीविषयी वापरकर्त्यांना सतर्क केले आहे. ज्यात सायबर गुन्हेगार वापरर्त्यांना कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात आणि त्यांना मेसेज पाठवतात आणि त्यांना पुन्हा ओटीपी शेअर करण्यास सांगतात. अशा कॉल फसवणुकीमुळे युझर्स त्यांना म्हणतात की, त्यांना त्यांचे खाते सत्यापित करण्याची आवश्यकता आहे आणि ते तसे न केल्यास ते बंद केले जाईल. या भीतीमुळे युझर्स त्यांचे ओटीपी शेयर करतात आणि त्यांच्या अकाउंटचाॲक्सेस गमावतात. हे फीचर युझर्सना त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.