नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपचे डिजिटल पेमेंट फीचर प्रलंबित आहे. परंतु काही रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप पॅरेंट कंपनी फेसबुकला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे. लवकरच अधिकृतरित्या व्हॉट्सअॅप पे भारतात लॉन्च होईल.
गेल्या दोनवर्षांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. एनपीसीआयने व्हॉट्सअॅपला भारतातील डिजिटल पेमेंट सर्व्हिस लायसन्सला परवानगी दिली आहे. डाटा लोकलायजेशनवरुन व्हॉट्सअॅपला परवाना मिळण्यास अडचणी येत आहेत. मात्र कंपनीने हे निश्चित केले आहे की व्हॉट्सअॅप लोकल डाटा रेग्युलेशन फॉलो करेल.
सुरुवातीला हे पेमेंट फीचर 1 कोटी यूजर्ससाठी सुरु केले जाईल. भारतात व्हॉट्सअॅप यूजर्सची संख्या अधिक आहे. व्हॉट्सअॅप पे मुळे पेटीएमशी स्पर्धा होईल. त्यामुळे पेटीएमचे सीईओ वारंवार व्हॉट्सअॅप पे वर टीका करत आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांच्यानुसार व्हॉट्सअॅपला कोणतेही लॉग इन सिस्टम नसल्याने ते सुरक्षित नसेल.