नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. WhatsApp च्या Policy वरून अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. कंपनीकडून सातत्याने नव्या पॉलिसीबाबत लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या वादानंतर या पॉलिसीला Accept करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार आता 15 मेपर्यंत पॉलिसी Accept करण्याचे सांगितले आहे.
जर तुम्ही 15 मेपर्यंत पॉलिसी Accept नाही केली तर काय होईल? याची माहिती तुम्हाला नसेल. पण आज त्याबाबत माहिती दिली जात आहे. कंपनीने सांगितले, की पॉलिसीला बॅनरच्या नावावर पुश करण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला नव्या पॉलिसीबाबत नोटिफिकेशनही मिळेल आणि ते तुम्ही वाचूही शकता. जर तुम्ही 15 मेपर्यंत पॉलिसी Accept केली नाही तर तुम्ही WhatsApp वरून मेसेज पाठवू शकणार नाही किंवा कॉलही करू शकणार नाही. इतकेच नाही तर पॉलिसी Accept केली नाही तर तुमचं WhatsApp चं बंद होईल.
…तर अकाउंटच होणार डिलिट
WhatsApp च्या टर्मनुसार, जे युजर 120 दिवसांपर्यंत इनऍक्टिव्ह राहील तर अकाउंट डिलिट केले जाईल. तसेच 15 मे पासून ते 120 दिवसापर्यंत तुमचे अकाउंट चालेल आणि त्यानंतर अकाउंटच डिलिट केले जाणार आहे.
15 मेनंतर नाही मिळणार बॅकअप
WhatsApp कडून सध्या 15 मेपूर्वी अकाउंटचा बॅकअप घेण्याचा पर्याय दिला जात आहे. त्यानुसार, 15 मेपर्यंत युजर्स चॅट हिस्ट्रीला अँड्राईड किंवा iOS फोनवर एक्सपोर्ट करून आपल्या अकाउंटचा रिपोर्ट डाऊनलोड करू शकतात. मात्र, 15 मेनंतर हा पर्याय उपलब्ध नसेल.