WhatsApp Privacy | व्हॉट्सअ‍ॅपनं आणले जबरदस्त फीचर ! सिलेक्टेड लोकांनाच दिसणार तुमचा प्रोफाइल फोटो; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  WhatsApp Privacy | फेसबुकच्या मालकीचे असणारे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवे फिचर्स आणत असते. त्याचप्रमाणे आता यंदा व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीनच प्रायव्हसी फीचर म्हणजेच गोपनीयता (WhatsApp Privacy) वैशिष्ट्य आणले होते. तसेच या फीचरच्या माध्यमातून वापरकर्त्याला अधिक कंट्रोल मिळतो. नेमकं फीचर्स काय आहे?, हे सविस्तर जाणून घ्या.

 

व्हॉट्सअ‍ॅपकडून My Contacts Except हे फीचर जारी करण्यात आले आहे. या नुसार या फीचरला आतापर्यंत फक्त व्हॉट्सअ‍ॅप अँड्राइट बीटा व्हर्जनसाठी जारी करण्यात आले होते. आता कंपनी इतर यूजर्ससाठी देखील फीचर जारी करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपचे अपडेटेड व्हर्जन 2.21465 बरोबर हे फीचर वेब आणि डेस्कटॉप यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

 

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप –

 

WhatsApp च्या या फीचरने यूजर्सला त्यांचे लास्ट सीन, स्टेट्स, प्रोफाइल फोटो आणि अबाउट डिस्क्रिप्शन कोण पाहू शकते, हे ठरवता येणार आहे. हे फीचर प्रायव्हसी सेटिंगमध्ये मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सध्या Everyone, My Contacts आणि Nobody हे पर्याय मिळतात. या फीचरच्या माध्यमातून यूजर्स लास्ट सीन, स्टेट्स, प्रोफाइल फोटो आणि अबाउट डिस्क्रिप्शन कोणाला दिसेल व कोणाला नाही, हे ठरवू शकणार आहे. त्याचबरोबर वापरकर्त्यांला ते कॉन्टॅक्टही निवडता येणार आहे, ज्यांना प्रोफाइल फोटो दाखवायचा नाहीये. यामुळे यूजर्सला प्रायव्हसीसंदर्भात (WhatsApp Privacy ) अधिक नियंत्रण मिळणार आहे.

 

Web Title : WhatsApp Privacy | Great feature brought by WhatsApp ! whatsapp users on android getting this new privacy feature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम