WhatsApp मध्ये आलं नवीन पद्धतीचं पासवर्ड ‘प्रोटेक्शन’, होणार जास्त ‘सुरक्षित’

पोलिसनामा ऑनलाईन – इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित झाले आहे. कारण आता युजर्सला आपल्या WhatsApp चॅट्सचे बॅकअप सुरक्षित करण्याचा पर्याय दिला जाईल.

WhatsApp चे नवीन फीचर्सचे ट्रॅक करणारे एक पोर्टल WABetainfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp एक नवीन फिचर आणत आहे. या फिचर अंतर्गत युजर्स आपल्या WhatsApp चॅट्स बॅकअपला पासवर्डने सुरक्षित करू शकतात.

हे नवीन फिचर सध्या Android युजर्सला दिले जाईल. हे फिचर WhatsApp च्या अँड्रॉइड व्हर्जन २.२९.११७ मध्ये दिले गेले आहे. या फीचरला Protect Backup म्हटले जात आहे.

रिपोर्टनुसार, हे फिचर अजूनही डेव्हलपमेंट स्टेज मध्ये आहे, पण याला लवकरच सगळ्या युजर्ससाठी सादर केले जाईल. WABetainfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे जिथे हे फिचर पाहू शकता.

WhatsApp Protect Backup फिचर असे करणार काम
WhatsApp च्या येणाऱ्या नवीन फिचर अंतर्गत आपल्या WhatsApp बॅकअपला पासकोड द्वारे सुरक्षित करू शकता. या अगोदर असे कोणतेही फिचर नव्हते.

खरंतर जेव्हा तुम्ही WhatsApp चे बॅकअप गुगल ड्राइव्ह वर सेव्ह करता आणि नवीन WhatsApp फोनमध्ये इन्स्टॉल करून बॅकअप रिस्टोअर करायचे असते तेव्हा तुम्हाला पासकोड विचारला जाईल.

WABetainfo च्या रिपोर्टनुसार, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जो पासवर्ड युजर्स सेट करतील तो WhatsApp आणि फेबबुकच्या सर्वरवर सेव्ह होणार नाही. म्हणजे जर तुम्ही पासवर्ड विसरला तर बॅकअपने तुम्ही चॅट हिस्टरी रिकव्हर करू शकणार नाही.

WhatsApp चे अँड्राईवड व्हर्जन २.२९.११७ मध्ये या फिचर शिवाय सर्च फिचर देखील दिले जाईल. या फिचर अंतर्गत तुम्ही फेक न्यूज किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजची ऑथेन्टिसिटी डायरेक्ट सर्च करू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like