आता WhatsApp वर ‘हे’ महत्वाचे फीचर मिळणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप नेहमी युजर्सला नवनवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून व्हॉट्सअ‍ॅप लवकरच डार्क मोड फीचरवर काम करत होतं. बीटा टेस्टींगनंतर लवकरच डार्क मोडचं स्टेबल व्हर्जन लाँच केलं जाईल असं म्हटलं जात होतं.

मात्र आता युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या डार्क मोड फीचरसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. बऱ्याच काळापासून वापरकर्त्यांना या फीचरची प्रतिक्षा होती. तर अ‍ॅन्ड्रॉईडच्या व्हॉट्सअ‍ॅप बीटावरून हे डार्क मोड हे फीचर पूर्णत: हटवण्यात आलं आहे.

सोशल नेट्वर्किंग साईट्सपैकी सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणले आहेत. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांना त्रास होतो त्यावर उपाय म्हणून व्हॉट्सॲप डार्क मोड फिचरवर काही दिवसापासून काम करत आहे. हे फीचर ऑन केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपचा बॅकग्राऊंड कलर काळा होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात.