खुशखबर ! ‘WhatsApp’नं सुरू केलं नवीन फिचर, ‘फेक न्यूज’ आणि अफवांना लगाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने आता एक नवीन महत्त्वाचे फिचर सुरु केले आहे. याआधीदेखील या फिचर संदर्भात आपल्याला माहीत होते मात्र आत्तापर्यंत याची चाचणी चालू होती. व्हाट्सअ‍ॅप चे हे नवीन वैशिष्ट्य फेक न्यूज आणि अफवांना लगाम घालण्यासाठी आणले गेले आहे.

हे फीचर Android आणि iPhone च्या वापरकर्त्यांना दिले जाणार आहे. हे फीचर Frequently Forwarded मेसेजेस साठी असून याच्या साहाय्याने वापरकर्त्याला कोणताही मेसेज किती वेळा फॉरवर्ड केले गेला आणि त्याची फ्रीक्वेंसी काय आहे यासंदर्भात माहिती मिळणार आहे. पाचपेक्षा अधिकवेळा फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर आता हे लेबल दिसणार आहे.

व्हाट्सअ‍ॅप लेटेस्ट व्हर्जन मध्ये हे फिचर दिलेले असून याआधीदेखील कंपनीने फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर एक चिन्ह द्यायला सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये एक सिंगल अ‍ॅरो मेसेजवर दिसतो ज्याचा अर्थ हा मेसेज फॉरवर्डेड आहे. आता येणाऱ्या नवीन अ‍ॅप वरील लेबल डबल अ‍ॅरो वाले असणार आहे.

व्हाट्सअ‍ॅप ने म्हटले की आम्ही वापरकर्त्यांची Privacy आणि Intimacy सांभाळण्यासाठी फॉर्वर्ड मेसेजला मर्यादित करत आहोत. एका वेळी केवळ पाच लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येऊ शकतात. एक मेसेज पाचहून अधिकवेळा फॉरवर्ड केला गेल्यास त्याला Double Arrow चे लेबल मिळेल. मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे एंड टु एंड एन्क्रिप्टेड होत असते. तसेच असे फॉरवर्ड मेसेज वापरकर्त्याने फॉरवर्ड केल्यास त्याला एक नोटीसदेखील दिसणार आहे. यामुळे व्हाट्सअ‍ॅप वर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांना लगाम देखील लगाम बसविला जाईल अशी माहिती व्हाट्सअ‍ॅप च्या एका प्रवक्त्याने माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त