‘WhatsApp’ वापरणार्‍यांना येणार दुप्पट मजा, युजर्सला मिळणार ‘हे’ 4 नवे आणि खास फिचर्स, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुचर्चित चॅटिंग व्हाट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन काही फिचर टाकण्यात आले आहेत. जुन्या व्हर्जनला अपडेट केल्यानंतर नवीन फिचर वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी काही मजेशीर फिचर सध्या टेस्टिंगमध्ये आहेत.

फिंगरप्रिंट आणि फेसलॉक फिचर
व्हाट्सअ‍ॅपच्या या फीचरमध्ये तुम्ही व्हाट्सअ‍ॅप फिंगरप्रिंट आणि फेसआयडी द्वारे उघडू शकता. तसेच अनेक प्रकरचा डेटा यामध्ये हाईड करण्याचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.

कॉन्जक्युटिव व्हाॅइस मेसेज फीचर
व्हाट्सअ‍ॅपने हे एक नवीन फिचर सुरु केले आहे. ज्याद्वारे सलग सर्व व्हाॅइस मेसेज ऐकता येणार आहेत. जुन्या प्रकारामध्ये प्रत्येक मेसेज वर क्लिक करून तो मेसेज ऐकावा लागत असे मात्र आता एका मेसेज नंतर बाकी मेसेज आपोआप प्ले होणार आहेत.

फेसबुक स्टोरी इंटीग्रेशन फीचर
या नव्या फीचरच्या माध्यमातून वापरकर्ते थेट आपला व्हाट्सअ‍ॅपवरील स्टेटस फेसबुकवर टाकू शकतात. यासाठी शेअर टू फेसबुक असा थेट पर्याय देण्यात आलेला आहे. ज्याद्वारे फेसुबक हा स्टेटस आपोआप जातो.

ग्रुप इनव्हाईट फीचर –
व्हाट्सअ‍ॅपच्या फीचरमुळे व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही व्यक्ती त्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकत नाही. यासाठी Nobody पर्यायावर क्लीक करावे लागणार आहे. त्यानंतर त्या वापरकर्त्याला ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यासाठी नोटिफिकेशन येईल त्याला मान्यता दिली तरच तो व्यक्ती ग्रुपमध्ये अ‍ॅड होईल.

Visit : policenama.com