प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp ठाम, म्हणाले – ‘जे पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांचे अकाऊंट होईल डिलिट’
नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईट व्हॉट्सअपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीच्या डेडलाईनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कंपनीने दिल्लीत सांगितले की, यूजर्सना आम्ही 15 मेपेक्षा जास्त सवलत देऊ शकत नाही, यासाठी ज्यांनी कुणी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकरलेली नाही, आता त्यांचे अकाऊंट आम्ही डिलिट करण्यास सुरूवात करू.
हायकोर्टात कंपनीची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की, यूजर्सना प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यास सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, जे यूजर्स पॉलिसी स्वीकारणार नाहीत, त्यांची अकाऊंट हळुहळु डिलिट केली जातील. आम्ही यूजर्सना पॉलिसीबाबत सहमत होण्याची विनंती केली आहे. जर ते सहमत नसतील तर आम्ही त्यांना डिलिट करू…, ही पॉलिसी स्थगित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
जानेवारीत आली होती नवी पॉलिसी
कंपनीच्या या पॉलिसीवरून आता वाद सुरू झाला आहे. कपिल सिब्बल यांचे म्हणणे आहे की, जे प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत नाहीत आणि ती स्वीकारायची नाही अशा यूजर्सचे अकाऊंट आम्ही डिलिट करत आहोत. सिब्बल यांनी म्हटले की, कंपनीने पॉलिसी स्थगित केलेली नाही. व्हॉट्सअपने प्रायव्हसी पॉलिसीचे नोटिफिकेशन जारी केले होते, त्यामध्ये 15 मेपर्यंतची डेडलाईन होती. ही पॉलिसी अगोदर जानेवारीत जारी केली होती, जिची डेडलाईन फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती आणि नंतर मे पर्यंत स्थगित केली होती.
काय आहे कंपनीच्या नवीन पॉलिसीत?
कंपनीच्या नविन पॉलिसीनुसार, व्हॉट्सअपला हा अधिकार असे की ते यूजर्सच्या इंटरॅक्शनशी संबंधीत काही डाटा पॅरेंट कंपनी फेसबुकशी शेअर करू शकतील. यावरून यूजर्सला कंपनी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी नोटिफिकेशन पाठवत आहे, जी स्वीकारल्यानंतरच व्हॉट्सअप पुढे सुरू राहील. यावरून हायकोर्टात सुनावणी सुरू आहे, जी सध्या 3 जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. अॅडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा आणि याचिकाकर्त्यांकडून यथास्थितीची मागणी करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंपनीने सुनावणी दरम्यान या पॉलिसीवर स्टे देण्यास विरोध केला.