Whatsapp सावधान ! तुमची सुरक्षा होऊ शकते भंग, सायबर एजन्सीने जारी केला अलर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर सावध व्हा. व्हॉट्सॲपच्या सुरक्षेत एक मोठी त्रुटी समोर आली आहे, ज्याद्वारे सायबर हल्लेखोर यूजरची संवेदनशील माहिती चोरू शकतात. हे आम्ही म्हणत नाही, तर भारताच्या सायबर सुरक्षेवर लक्ष ठेवणारी एजन्सी कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) ने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

नुकतीच समोर आली त्रुटी
सीईआरटीने व्हॉट्सॲपमध्ये यूजरच्या महितीची सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या अनेक गंभीर त्रुटी शोधल्या आहेत. एजन्सीने म्हटले आहे की, सुरक्षेतील त्रुटी गंभीर घटनांना जन्म देऊ शकते. व्हॉट्सॲपची ही कमतरता नुकतीच समोर आली आहे.

सायबर एजन्सीने व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सॲप बिझनेसच्या ज्या सॉफ्टवेयरमध्ये सुरक्षेचा धोका शोधून काढला आहे त्यामध्ये अँड्राईडच्या व्ही 2.21.4.18 आणि आयफोन यूजरच्या व्ही 2.21.32 सॉफ्टवेयरचा समावेश आहे. या दोन्ही व्हर्जनमध्ये उच्च स्तरावरील सुरक्षा त्रुटी आढळली आहे.

सायबर हल्लेखोर करू शकतात घुसखोरी
सीईआरटीने जो अलर्ट जारी केले आहे त्यामध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सॲप अ‍ॅप्लीकेशनमध्ये अशा त्रुटी आढल्या आहेत, ज्या दूर बसलेल्या सायबर हल्लेखोरांना मनमानी कोड टाकणे किंवा एखाद्या सिस्टममध्ये घुसून संवेदनशील माहितीपर्यंत पोहचण्याची परवानगी देऊ शकतात. या त्रुटींद्वारे सायबर हल्लेखोर एखाद्या सिस्टममध्ये घुसून आपल्या मनाप्रमाणे कोड टाकण्यासह माहिती सुद्धा चोरू शकतात.

या त्रुटींबाबत माहिती देताना रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे कॅश कॉन्फिगरेशनची समस्या आणि ऑडियो डिकोडिंग पाईपलाईनमध्ये बाऊंड चेकच्या अनुपस्थितीमुळे झाले आहे. सायबर एजन्सीने सुरक्षा धोक्यापासून वाचण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप्पल प्ले स्टोअरला व्हॉट्सअपचे नवीन व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, यावर व्हॉट्सअपकडून कोणतेही उत्तर अद्याप आलेले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.