WhatsApp करणार ‘या’ युजर्सचे अकाऊंट ‘बॅन’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज प्रत्येकाला मोबाईल लागतो आणि त्यात व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक असे अँप लागतातच. व्हाट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लवकरच कंपनी अल्पवयीन युजर्सचे अकाऊंट बंद करणार आहे. आणि नवीन एक फिचर लॉंच करणार आहे. ज्यामध्ये वयाची अट टाकण्यात येणार आहे.

व्हाट्सअ‍ॅपची क्रेझ इतकी आहे की, आजच्या काळात फार कमी लोक असे आहेत जे व्हाट्सअ‍ॅप वापरात नसतील. सध्या कंपनीच्या नियमाप्रमाणे यूजर्ससाठी वयोमर्यादा १६ वर्षे होती. तर इतर काही देशांतील युजर्ससाठी ही वयोमर्यादा १३ वर्षे इतकी होती. १३ वर्षापेक्षा लहान मुलेही याचा वापर करत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा युजर्सचे खाते बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

या फीचरमध्ये आणखी काही नवीन गोष्टी टाकल्या जाऊ शकतात. परंतु कंपनीने याबाबत काही सांगितलेले नाही. सध्या कंपनी फक्त १३ वर्षाखालील युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचा विचार करत आहे. मात्र असे झाले तर व्हाट्सअ‍ॅपला युजर्सचा फटका बसू शकतो आणि ते लोक इतर अ‍ॅपकडे वळू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –