WhatsApp चे चॅट सुरक्षित तर कसे समोर येताहेत Drugs संबंधित व्हाट्स ऍप चॅट्स ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहेत, तर बॉलिवूड स्टार्सचे ड्रग्ज संबंधित चॅट्स कसे लीक होत आहेत? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याच दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपचे एक विधानही आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात नवीन काहीही सांगितलेले नाही. यापूर्वीही कंपनीने हे सांगितले आहे आणि कदाचित तुम्हा सर्वांना हे माहित असेल की एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे. पण तरीही तुम्हाला हे माहित असणे महत्वाचे आहे की, अप्रत्यक्षपणे व्हॉट्सऍप चॅट कसे मिळवले जाऊ शकतात.

कंपनीच्या प्रवक्त्याने नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘व्हॉट्सऍप तुमचे संदेश एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनसह संरक्षित करते, जेणेकरून तुम्ही ज्या व्यक्तीला मेसेज पाठवत आहात त्यानेच मेसेज पाहावा, त्याशिवाय कोणीही मेसेज ऍक्सेस करू शकत नाही, व्हॉट्सअ‍ॅप देखील नाही.’

व्हॉट्सअ‍ॅपने असेही म्हटले आहे की, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की व्हॉट्सऍपवर केवळ फोन नंबरद्वारे साइन अप केले जाऊ शकते आणि व्हॉट्सऍपकडे तुमच्या मेसेजच्या संपर्काचा ऍक्सेस नसतो.

व्हॉट्सऍप चॅट्स सुरक्षित आहेत, पण बॅकअप सुरक्षित आहे का ?
व्हॉट्सअ‍ॅपच्या मते, जे चॅट्स बॅकअप क्लाऊड स्टोरेजवर बॅकअप ठेवले जातात किंवा सेव्ह केले जातात ते एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड नसतात. सहसा युजर्स Google ड्राइव्हवर त्यांच्या व्हॉट्सऍप चॅटचा बॅकअप ठेवतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चॅट्सच्या ऑटो बॅकअपचाही पर्याय आहे, त्या अंतर्गत चॅट्स स्वतःच क्लाउडवर स्टोअर होतात.

जर तुमचे व्हॉट्सऍप चॅटला ऍक्सेस करू शकत नसेल, तर ते हवे असल्यास तुमच्या जीमेल आयडीद्वारे गुगल ड्राइव्हवरून सहजपणे सर्व जुने चॅट वाचू शकते. कारण येथे ठेवलेले व्हाट्सऍप चॅट्स बॅकअप एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड नसतात.

सिक्युरिटी किंवा तपास संस्था क्लोनिंग करतात
व्हॉट्सअ‍ॅपच्या एन्क्रिप्टेड डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षा आणि तपास संस्था युजरचा फोन घेऊन त्याला क्लोनिंग करतात. क्लोनिंग दुसर्‍या डिव्हाइसवर केले जाते.

क्लोनिंग केल्यानंतर एजन्सींना मिरर इमेजद्वारे हटवलेल्या मेसेजमध्ये प्रवेश मिळतो. यासाठी प्रोफेशनल टूल्स वापरले जातात आणि हे वेगळ्या डिव्हाइसवर केले जाते.

आता फोनची क्लोनिंग केली गेली तर त्यामुळे एजन्सीला फोनचे मेसेजेस, फोटो, कॉल रेकॉर्ड आणि यासह क्लाउड ऍप्सवर ठेवलेल्या डेटामध्येही प्रवेश मिळतो. आता येथून व्हॉट्सऍपचे चॅट्स सहज मिळू शकतात.

एकंदरीत असे म्हणता येईल की, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे, पण त्याचा बॅकअप सुरक्षित नाही. जर बॅकअपमध्ये प्रवेश मिळाला, तर चॅट्स पुन्हा रिकव्हर होतील. तपास यंत्रणाही थेट व्हॉट्सऍपवरून चॅट मिळवू शकत नाहीत.