Coronavirus Impact : ‘कोरोना’ व्हायरसमुळं WhatsApp वरील Status लावण्याची पध्दत ‘बदलली’, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फीचर हे भारतात वापरल्या जाणार्‍या लोकप्रिय फीचरपैकी एक आहे. आता या लाखो युजर्सच्या पसंतीच्या फीचर ‘स्टेटस’ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स आता त्यांच्या स्टेटसमध्ये फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ ठेवू शकणार आहे. या आधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला 30 सेकंदांचा व्हिडिओ ठेवला जात होता. असे मानले जात आहे की, व्हॉट्सअ‍ॅपने इंटरनेट सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी पुर्ण देशभरात लॉकडाऊन चालू आहे. अशामध्ये डेटाचा वापर जास्तप्रमाणात होत असून सर्व्हरवर भार पडत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
WhatsApp पर टेस्ट किया गया स्क्रीनशॉट.

याबाबत माहिती देताना WABetainfo म्हणाले की, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसमध्ये 15 सेकंदापेक्षा जास्त असलेले व्हिडिओ शेअर करता येणार नाही. कारण सव्हर इन्फ्रास्ट्रक्रवरील ट्रैफिक कमी करणे हा त्यांचा हेतू आहे. असे मानले जात आहे की, भारतीय युजर्स स्टेटसचा उपयोग बाकी फिचर्सपेक्षा जास्त करतात.

टेक क्रंचच्या अहवालानुसार, भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 400 दशलक्ष अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. जेव्हा एका वृत्तसंस्थेने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्हिडिओमध्ये केवळ 15 सेकंदांचा व्हिडिओ ठेवता आला, म्हणजेच हे फीचर भारतीय युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like