पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर प्रायव्हसीच्या कारणामुळे व्हॉट्सअप सोडून इतर एखाद्या अॅपमध्ये जाणार असाल तर तुम्ही तुमचे हे अकाऊंट डिलिट करणे योग्य ठरेल. अकाऊंट डिलिट करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या याची पद्धत…
अँड्रॉइड
– व्हॉट्सअपमध्ये जा आणि टॉप राइट कॉर्नरमधील तीन डॉटेड आयकॉनवर टॅप करा.
– यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन अकाऊंट सेक्शनमध्ये जा आणि तिथे डिलिट माय अकाऊंट ऑपशनवर टॅप करा.
– या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर एंटर करावा लागेल आणि डिलिट माय अकाऊंटवर टॅप करावे लागेल.
– यानंतर एक ड्रॉपडाऊन मेन्यूत तुम्हाला तुमचे अकाऊंट डिलिट करण्याचे कारण विचारले जाईल. तुम्हाला एक ऑपशन निवडावे लागेल.
– यानंतर डिलिट माय अकाऊंटवर टॅप करा.
– आपल्या आयओएस डिव्हाइसवर व्हॉट्सअप ओपन करा आणि नंतर सेटिंग्ज अकाऊंट डिलिटमाय अकाऊंटवर जा.
– यानंतर तुमचा फोन नंबर एंटर करा आणि डिलिट माय अकाऊंटवर टॅप करा.
व्हॉट्सअप अकाऊंट डिलिट केल्यानंतर काय होईल?
कंपनीचे म्हणणे आहे की, एकदा व्हॉट्सअप अकाऊंट डिलिट केल्यानंतर तुम्हाला त्याचा अॅक्सेस मिळणार नाही आणि तुम्हाला नवीन अकाऊंट बनवावे लागेल. व्हॉट्सअॅप तुमची माहिती डिलिट करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ घेईल.
व्हॉट्सअपचे हे सुद्धा म्हणणे आहे की, तुमची माहिती कॉपी बॅकअप स्टोरेजमध्ये 90 दिवसानंतर सुद्धा स्टोअर राहू शकते. या बॅकअप स्टोरेजचा वापर कंपनी एखादी दुर्घटना किंवा सॉफ्टवेयर एरर किंवा एखाद्या दुसर्या डेटा लॉस इव्हेंटनंतर डेटा रिकव्हरी करण्यासाठी करते.