उद्यापासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये नाही राहणार WhatsApp चा ‘सपोर्ट’, तुमच्या फोनचं काय ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – 31 डिसेंबर 2019 पासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप काम करणे बंद करेल. कंपनीने याची पहिल्यांदा देखील घोषणा केली आहे आणि सांगितले होते की जर तुम्ही जुने स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्ही अपग्रेड करु शकतात.

फेसबुकची कंपनी व्हॉट्सअ‍ॅपने FAQ पेज अपडेट करुन त्यात त्या स्मार्टफोन बद्दल दिले आहे की कोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही. यात Android, iOS आणि Windows ऑपरेटिंग सिस्टम असलेले स्मार्टफोन आहेत.

Android 2.3.7 वर्जनवर चालणारे स्मार्टफोन किंवा या पेक्षा कमी वर्जनच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर सपोर्ट करणं बंद होईल. पुढील वर्षी 2020 पासून या स्मार्टफोनवर यूजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकणार नाहीत.

Windows ऑपरेटिंग सिस्टम असलेले स्मार्टफोनवर 31 डिसेंबर 2019 पासून व्हॉट्स अ‍ॅप सपोर्ट करणार नाही. मायक्रोसॉफ्टने स्वत: आपल्या Windows 10 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट बंद केला आहे.

या वर्जनच्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp सपोर्ट करणं बंद होईल.

1. Windows ऑपरेटिंग सिस्टम असलेले सर्व स्मार्टफोन
2. iOS 8 किंवा त्यापेक्षा जुन्या वर्जन असलेले आयफोन किंवा आयपॅड
3. Android version 2.3.7 पेक्षा जुने वर्जन

जर तुमच्याकडे हे ऑपरेटिंग सिस्टम असलेले स्मार्टफोन असतील तर तुम्ही ते अपडेट करुन घ्या. जर फोन बदलणार असाल तर तुमच्या गुगल ड्राइव्हवर व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटचे बॅकअप घ्या. तसेच तुम्ही एक्सोपर्ट देखील करुन जीमेल अकाऊंटवर सेव्ह करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/