WhatsApp वर लवकरच येऊ शकतं ‘हे’ मोस्ट अवेटेड फिचर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपची एक समस्या अशी आहे की त्यात क्रॉस-प्लॅटफॉर्म सपोर्ट नाही. तसे तर व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील एक उत्तम मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, पण मल्टिपल डिव्हाइसवर हे अ‍ॅप वापरू शकत नाही. दरम्यान याबाबत काही माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या विकासाचा मागोवा घेणाऱ्या ट्विटर अकाउंट @WABetaInfo ने मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरची अंतर्गत चाचणी सुरू असल्याची माहिती दिली आहे. मात्र अहवालात या फिचरच्या रिलीज तारखेसंदर्भात किंवा वेळेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या आशा आहे की कंपनी लवकरच हे फिचर जाहीर करेल.

हे ऐकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही की, व्हॉट्सअ‍ॅप मल्टिपल मोबाईल डिव्हाइस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. WABetaInfo ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि मागील महिन्यातही या फिचर संबंधित काही माहिती दिली होती.

असे सांगितले जात आहे की, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरचे नाव ‘लिंक्ड डिवाइसेस’ असेल. कारण याद्वारे युजर्स ‘लिंक्ड अ न्यू डिव्हाइस’ बटणावर क्लिक करून एका डिव्हाइसमध्ये लॉग इन करू शकतील.

सध्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना एकच खाते मल्टिपल डिव्हाइसमध्ये वापरण्याची परवानगी देत नाही. पण हे फिचर टेलिग्राममध्ये उपलब्ध आहे.

मल्टिपल डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप खाते चालवणे, व्हॉट्सअ‍ॅपला वेबमध्ये वापरण्यापेक्षा वेगळे असेल. या नवीन फिचरसाठी युजर्सना वेगवेगळ्या डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपमध्ये त्यांचे खाते व्हेरिफाय करावे लागेल.

सध्या या येणाऱ्या फिचरसाठी काहीही सांगणे योग्य आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित करणे हे कंपनीसाठी सर्वात मोठे आव्हान आहे.