व्हॉट्सअॅपला तुमच्या डोळ्यांची काळजी रे…! आणले नवीन फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सोशल नेटवर्किंग साईटस पैकी व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि आवडते अॅप आहे. व्हॉट्सअॅप नेहमी आपल्या युजर्स काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत असते आता व्हॉट्सअॅप द्वारे काही नवीन फीचर्स लॉंच करण्यात आले आहेत. स्वाइप टू रिप्लाय, डार्क मोड, प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशन, एक्सपान्डेबल ग्रुप इन्फो अशी नवीन फीचर्स आणले आहेत

यापैकी सर्वात भन्नाट फिचर म्हणजे “डार्क मोड” . आता तुमच्या डोळ्यांची काळजी व्हाट्स अॅप घेणार आहे. ‘डार्क मोड’ असं या फिचरचं नाव असून यामुळे यूजर्सच्या डोळ्यांवरील ताण कमी होणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी कमी प्रकाशातही डोळ्यांवर ताण न देता व्हॉट्सअॅपचा वापर या फिचरमुळे करता येणार आहे. यंग जनरेशन कडून व्हॉट्सअॅप चा वापर सर्वाधिक केला जातो. सतत डोळ्यासमोर मोबाईलचा प्रकाश राहिल्यामुळे डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी त्याचा जास्त परिणाम होतो . त्यामुळेच हा “डार्क मोड” चा पर्याय व्हॉट्सअॅप युजर्स साठी फायदेशीर ठरणार आहे.

‘हे’ कलाकार बनणार आता स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर

स्वाइप टू रिप्लाय

स्वाइप टू रिप्लाय हे फिचर याआधी आयफोनसाठी देण्यात आलं होतं. मात्र आता अॅन्ड्रॉइडसाठीही ते लवकरच उपलब्ध होणार आहे. या फिचरच्या मदतीने कोणालाही पटकन रिप्लाय देता येणार आहे. आलेल्या मेसेजला केवळ स्वाइप करुन संबंधित व्यक्तीला रिप्लाय देता येईल.

प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशन

व्हॉट्सअॅपचे बीटा युजर्स हे प्रीव्हयू मीडिया फ्रॉम नोटीफिकेशनचा वापर करत आहेत. या फिचरमुळे ग्रुपमध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ याबाबतच्या सर्व सूचना पाहणं लगेच शक्य होणार आहे. त्यासाठी पुन्हा संपूर्ण चॅट ओपन करण्याची गरज नाही.

एक्सपान्डेबल ग्रुप इन्फो

व्हॉट्सअॅप नेहमीच ग्रुप अॅडमीनला वेगवेगळे अधिकार हे फिसर्चच्या माध्यमातून देत असतं. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन असलेल्या युजर्ससाठी ग्रुप इन्फोरमेशनमध्ये एका नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार ग्रुपमधील १० सदस्यांचा यादी दिसते. तुम्हाला जर संपूर्ण यादी पाहायची असेल तर तुम्ही नव्या पर्यायाचा वापर करू शकता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’803eae7d-bcc9-11e8-ae02-2ff5c0c3f175′]