WhatsApp trick | WhatsApp ची आश्चर्यकारक ट्रिक ! कुणालाही न कळता वाचू शकता दुसर्यांचे मेसेज; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअॅप (WhatsApp) चे अनेक फिचर्स असे आहेत ज्याबाबत खुप कमी लोकांना माहिती आहे. बहुतांश यूजर्स केवळ नॉर्मल चर्चा करणे, डॉक्युमेंट शेयर करणे, फोटो – व्हिडिओ शेयर करण्यासाठीच व्हॉट्सअॅप वापरतात. परंतु, आज जी ट्रिक (WhatsApp trick) आम्ही सांगणार आहोत ती अतिशय उपयोगी पडणारी आहे. तिच्या मदतीने तुम्ही दुसर्यांचे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) आपल्या फोनवर पाहू शकता, ते सुद्धा कुणाला न समजता. ही पद्धत जाणून घेवूयात… WhatsApp trick | whatsapp amazing trick read messages of others on your phone without anyone knowing
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
तुम्हाला सुद्धा एखाद्याचे व्हॉट्सअॅप मेसेज (WhatsApp message) त्याला समजू न देता वाचायचे असतील तर ही ट्रिक तुमच्या खुप उपयोगी येऊ शकते.
सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये whatScan for whatsApp web app नावाचे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
ही एक Apk फाईल असेल, जी इन्स्टॉल करण्यापूर्वी मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन
Unknown Sources ऑपशन ऑन करावे लागेल.
तेव्हाच हे अॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होऊ शकते.
अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा आणि त्याच्या बेसिक सेटिंगमध्ये जाऊन
भाषा सिलेक्ट करा आणि नंतर पासवर्ड सेट करा.
म्हणजे तुम्ही तुमच्या सुविधेनुसार सेटिंग करून घ्या. यानंतर तुम्हाला QR कोड मिळेल.
–
यानंतर तुम्हाला ज्याचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक (WhatsApp account hacked) करायचे आहे त्याचा फोन उचला आणि त्यामध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा. व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा, तिथे तुम्हाला मेनूमध्ये whatsapp web चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर कॅमेरा सुरू होईल. कॅमेर्यातून आपल्या फोनमधील तो क्यूआर कोड स्कॅन (QR code scan) करा. इतके करताच त्याची सर्व चर्चा तुमच्या मोबाइल स्क्रीनवर पाहू शकता. आता त्याचा फोन परत ठेवून द्या आणि आपल्या फोनमध्ये त्याचे चॅट वाचत रहा.
WhatsApp trick | whatsapp amazing trick read messages of others on your phone without anyone knowing
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update