WhatsApp Update : नवीन Ringtone पासून ते डिझाईनपर्यंत लवकरच येताहेत ‘ही’ 4 नवीन ‘फीचर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या नव्या अपडेट बरोबरच एक्सपेरिअन्स देखील बदलतो आणि आता समजले आहे की आणखी बरीच नवीन फीचर्स येत आहेत. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यास वापरकर्त्यांना लवकरच वापरण्याची संधी मिळेल . ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपने गूगल बीटा प्रोग्राममध्ये 2.20.198.11 ही नवीन आवृत्ती सादर केल्याची माहिती मिळाली आहे. जाणून घेऊया या नवीन फीचर्सबाबत…

ग्रुप कॉलसाठी रिंगटोन
या नवीन आवृत्तीमध्ये वापरकर्त्यांना ग्रुप कॉलसाठी रिंगटोन मिळेल. सांगण्यात आले की जेव्हा जेव्हा तुम्हाला ग्रुप कॉल येईल तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन रिंगटोन वाजेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही रिंगटोन लूपवर असेल.

नवीन स्टिकर अ‍ॅनिमेशन
व्हॉट्सअ‍ॅपवर नुकतेच अ‍ॅनिमेटेड स्टिकर्ससाठी एक नवीन प्रकारच्या अ‍ॅनिमेशनला सादर करण्यात आले होते, जे लूपवर 8 वेळा प्ले होते. त्याच वेळी दीर्घ अ‍ॅनिमेटेड स्टिकर्ससाठी लूपला कमी केले जाईल आणि ते कमी वेळा प्ले होईल. हे फीचर 2.20.198.11 मध्ये समाविष्ट केले आहे.

कॉलसाठी यूआय सुधारणा
व्हॉट्सअ‍ॅप सध्या कॉलचा युजर इंटरफेस सुधारण्याचे काम करीत आहे. अपडेट आल्यानंतर सर्व बटणे स्क्रीनवर खालच्या दिशेने दिसू शकणार आहेत.

स्टोरेज वापर टूल
व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन टूलवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच स्टोरेज वापरासाठी एक नवीन फीचर सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. WABetaInfo ने ही माहिती दिली आहे आणि म्हटले आहे की व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही महिन्यांपासून या नवीन फीचरची टेस्टिंग घेत आहे, ज्याच्या रिलीजची तारीख अद्याप माहित झालेली नाही.

असे म्हटले गेले आहे की या फीचरच्या मदतीने यूजर्स स्पेस मोकळी करू शकतील, तसेच ते व्हॉट्सअ‍ॅप मीडियाला देखील एक्सप्लोर करू शकतील. अहवालानुसार, त्याचे पहिले टूल फिल्टर म्हणून काम करेल, जेणेकरून फोर्वडेड आणि मोठ्या फायली सापडतील. यातच दुसर्‍या सेक्शनमध्ये वापरकर्ता शेअर्ड फायलीचे पुनरावलोकन करू शकतो, जेणेकरुन निरुपयोगी मीडिया हटविला जाऊ शकेल आणि यामुळे फोनची स्पेस वाचविण्यात मदत होईल.