आता ‘WhatsApp’ अपडेट करू नका, मोबाईलमध्ये निर्माण होऊ शकते’ ही’ समस्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक नवीन अपडेट आले आहे, ज्यामुळे काही युजर्सच्या मोबाईलमध्ये समस्या निर्माण होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी WABetaInfo ला केलेल्या तक्रारीनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या ताज्या अपडेटनंतर फोनची बॅटरी वेगाने कमी होत आहे.

iOS 2.19.112 अपडेट केल्यावर ही समस्या उघडकीस आली आहे. आयओएस वापरकर्त्यांनी याविषयी स्क्रिनशॉट्स शेअर करत व्हॉट्सअ‍ॅप बॅकग्राऊंड फोनची बॅटरी लवकर कशी संपवते हे दर्शवले आहे.

https://twitter.com/rahulpathi/status/1192745481819975681

काही अँड्रॉइड युजर्सना देखील अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. एका युजरने सांगितले की त्याच्या फोनची बॅटरी सुमारे 15 मिनिटांत 23%संपत आहे आणि हे पुन्हा पुन्हा होत आहे.

युजर्सचे म्हणणे आहे की ‘WhatsApp is draining your battery’ असे थोड्या थोड्या वेळाने नोटिफिकेशन येते, याच कारणामुळे फोन पूर्ण चार्ज केल्यावर काही वेळातच फोनची बॅटरी खूप कमी होते.

Visit : Policenama.com