WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही ; कारण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ‘सेव्ह’ आणि ‘अनसेव्ह कॉन्टॅक्ट’चं प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवणार आहे. आता युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हे फीचर काढण्यात येणार आहे. याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपमधील अल्बम ले-आऊट आणि ऑडियो फॉरमॅट करण्याचे फिचर व्हॉट्सअ‍ॅपकडून बंद करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने कॉन्टॅक्टसचे प्रोफाईल फोटो कॉपी किंवा शेअर करण्यावर निर्बंध लावले आहेत. असं असलं तरी युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या अनेक ग्रुपचे फोटो डाऊनलोड अथवा शेअर करता येणार आहेत.

नवीन अपडेट –

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अनेक फोटो एकाच वेळी पाठवले असतील तर त्या फोटोंचा एक अल्बम तयार होऊन तो संपूर्ण अल्बम डाऊनलोड करता येणं शक्य होतं. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये, या अल्बममध्ये नेमके किती फोटो आहेत त्याची संख्या त्या अल्बमवर दाखवण्यात येणार आहे आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील ऑडिओसाठी वापरलं जाणारं ओपस मॉडेल बदलून त्याजागी (M4A) एमफोरए हे मॉडेल वापरण्यात येणार आहे.

युझर्सच्या सुरक्षिततेसाठी व्हॉट्सअ‍ॅप अनेक उपाययोजना करत आहेत. यापूर्वी गोपनीयता वाढवण्यासाठी चॅटचे स्क्रीनशॉट काढण्यास बंदी घातली होती. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने ‘फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन’ फीचर आणले होते. त्यानंतर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्यावरही बंदी आणली आहे.