WhatsApp युजर्सला येणार मज्जा, आता एकाच फोनमध्ये 2 अकाऊंटवरून करू शकणार चॅटिंग, जाणून घ्या पध्दत
नवी दिल्ली : वृत्त संस्था – व्हॉट्सअप एक असे अॅप आहे, जे सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरले जाते. फोटो, व्हिडिओ आणि डॉक्यूमेंट शेयर करण्यासाठी हे उपयोगी येते. यामुळेच व्हॉट्सअपच्या यूजर्सची संख्यासुद्धा सुमारे सव्वा दोन अरबवर पोहचली आहे. व्हॉट्सअपवर लवकरच एक असे फिचर येणार आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअप अकाऊंट एकपेक्षा जास्त डिव्हाइसवर चालवू शकता.
सध्या कंपनी हे फिचर टेस्ट करत आहे, जे येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तर ड्यूअल सीम स्मार्टफोनच्या जमान्यात बहुतेक यूजर्स आहेत, ज्यांना आपल्या फोनवर दोन सीमचे वेगवेळे व्हॉट्सअप अकाऊंट चालवायचे आहे. आज यूजर्सना आम्ही अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमच्या फोनवर वेगवेगळे व्हॉट्सअप अकाऊंट एकसोबत चालवण्यात काहीच अडचण येणार नाही.
फोनमध्ये अगोदरच येणार्या स्मार्टफोनच्या एका फिचरचा वापर करावा लागेल. सॅमसंग, वीवो, ओप्पो, हुवावे, शाओमी, आणि ऑनर सारख्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल अॅप किंवा ड्यूअल मोठी नावाचे फिचर येते. हे वेगवेगळ्या फोनमध्ये वेगळ्या नावाने दिलेले असते. याद्वारे एकाच चॅटींग अॅपवर दोन अकाऊंटवर वापरू शकता. ज्या फोनमध्ये हे अॅप नसेल ते अॅप प्ले स्टोरवरून डाऊनलोड करू शकतात.
एका फोनमध्ये दोन व्हॉट्सअप असे चालवा
– आपल्या फोनच्या डयूअल अॅप्स सेटींग्ज ओपन करा.
– ज्या अॅपला क्लोन बनवायचे आहे ते सिलेक्ट करा. (येथे तुम्हाला व्हॉट्सअप सिलेक्ट करायचे आहे)
– प्रोसेसर पूर्ण होण्याचे वाट पहा.
– आता तुमच्या होम स्क्रीनवर एक नवीन व्हॉट्सअप लोगो येईल. त्यावर टॅप करा.
– आता यामध्ये दुसर्या नंबरने लॉगिन करून वापरा.
जाणून घ्या कोणत्या फोनमध्ये कोणत्या नावाने
– सॅमसंग
सॅमसंगमध्ये हे फिचर ड्यूअल मेसेंजर नावाने आहे. फोनच्या सेटींग्जमध्ये जाऊन अॅडव्हान्स फिचर ऑपशनमध्ये जा. येथे हे फिचर मिळेल.
– ओप्पो
ओप्पोमध्ये हे फिचर क्लोन अॅप च्या नावाने दिले आहे. हे सेटींग्ज मध्ये जाऊन अॅक्सेस करू शकता.
– वीवो
वीवोमध्ये हे फिचर क्लोन अॅप या नावाने मिळेल. हे सेटींग्ज मध्ये जाऊन अॅक्सेस करू शकता.
– शाओमी
स्मार्टफोन सेटींग्ज मध्ये जा. येथे तुम्हाला ड्युअल अॅप चे ऑपशन मिळेल.
– आसुस
आसुस स्मार्टफोनमध्ये सेटींग्ज मध्ये जा. येथे तुम्हाला ट्विन अॅप चे ऑपशन मिळेल.
– हुवावे
या दोन्ही फोनमध्ये हे फिचर ट्विन अॅप च्या नावाने मिळेल. हे सेटींग्ज मध्ये जाऊन अॅक्सेस करू शकता.