WhatsApp वर SMS पाठऊन बँक अकाऊंटमधील बॅलन्स तपासा, फ्रीमध्ये मिळेल बँकेची ही सुविधा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण व्हाट्सअॅप वरून अनेकदा फोटोज व्हिडीओज पाठवत असतो मात्र आता वॉट्सअॅप वरून तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत याची माहिती मिळणार आहे. कोटक महिंद्रा, एचडीएफसी सह अनेक बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे. जाणून घेऊयात नेमकं कशा प्रकारे ही सुविधा वापरता येणार आहे.
ही सुविधा सुरु करण्यासाठी द्यावा लागेल मिस्ड कॉल –
बँकेने ठरवून दिलेल्या नंबर वर खाते धारकांना मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. ज्याचा अर्थ हा असेल की बँक धारक व्हाट्सअॅप वरून माहिती मिळवायला अनुमती देत आहे. यानंतर व्हाट्सअॅप वर डेबिट आणि क्रेडिट कार्डची तसेच एफडी लोन आणि बँक स्टेटमेंट सारखी माहिती मिळवू शकतात. आपल्या बँकेचा व्हाट्सअॅप क्रमांक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
क्रेडिट कार्डचीसुद्धा मिळणार माहिती –
आता क्रेडिट कार्ड वापरणारे सुद्धा त्याबाबतची सर्व माहिती व्हाट्सअॅप वर मिळवू शकतात. यासाठी क्रेडिट कार्डचे शेवटचे चार आकडे लिहून मेसेज पाठवावा लागणार आहे. त्यानंतर कार्डच्या बॅलेन्स बाबतची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे फिक्स डिपॉझिट बाबतची माहिती देखील याद्वारे मिळू शकणार आहे.
यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही –
या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही. यामुळे ग्राहकाचे काम अगदी सहज होणार आहे आणि बँकिंग प्रोसेस सुद्धा यामुळे सोप्या होणार आहेत. जर युजर्सचा मोबाईल चोरी झाला तर इमेल द्वारे ही सेवा बंद करता येऊ शकते. व्हाट्सअॅप बँकिंग मध्ये डेटा इतर कोणासोबत देखील शेअर केला जात नाही म्हणून ही प्रणाली सुरक्षित आहे.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर