WhatsApp Voice Transcription | ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर लवकरच येतंय Voice ट्रांन्स्क्रीप्शन फीचर, जाणून घ्या कसं करेल हे अ‍ॅप काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Voice Transcription | व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर व्हॉईस ट्रांन्स्क्रीपशन (WhatsApp Voice Transcription) वर सध्या काम करत आहे. रिपोर्टनुसार, हे फीचर यूजर्ससाठी ऑपशनल असेल आणि सध्या ते डेव्हलप केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वीच चॅट बॅकअपसाठी एंड-टू-एंड एन्क्रिपशन सादर करून आपल्या मेसेजमध्ये एका नवीन सुरक्षा लेयरचा समावेश केला आहे.

चार महिन्यापूर्वीच केले होत स्पष्ट
पॉप्युलर टिपस्टर Wabetainfo नुसार, व्हॉट्सअप आपल्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये व्हॉईस ट्रांन्स्क्रीपशन फीचर आणण्यासाठी काम करत आहे. याचा थेट अर्थ आहे की, जेव्हा फीचर रोलआऊट केले जाईल तेव्हा अ‍ॅप व्हॉईस मेसेजला ट्रान्सक्रिप्शन करणे सुरू करेल. रिपोर्टनुसार, आम्ही अगोदरच अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर थर्ड-पार्टी अ‍ॅपचा वापर करून चार महिन्यापूर्वी व्हॉईस मेसेजचे ट्रांन्स्क्रीपशन मिळवण्याबाबत बोललो होतो.

अगोदर होती अतिरिक्त अ‍ॅपची गरज
व्हॉट्सअप या फीचरला सपोर्ट करत नसल्याने एक अतिरिक्त अ‍ॅपची आवश्यकता होती, परंतु आता गोष्टी बदलत आहेत म्हणून आम्ही घोषणा करू शकतो की, व्हॉट्सअप व्हॉईस मेसेज ट्रांन्स्क्रीपशनवर काम करत आहे.

 

कसे काम करेल हे फीचर?

व्हॉट्सअ‍ॅपवर फीचर ट्रॅकर म्हणते की, ट्रांन्स्क्रीपशन मिळवण्यासाठी तुमचे मेसेज व्हॉट्सअप किंवा फेसबुक सर्व्हरवर पाठवले जाणार नाहीत, परंतु अ‍ॅपल स्पष्टपणे व्हॉईस ट्रांन्स्क्रीपशन फीचर प्रदान करते. तर तुमचा व्हॉईस मेसेज अ‍ॅपलला आपले स्पीच रेकग्नेशन चांगले करण्यास मदत करेल, हे तुमच्या नावाशीच जोडलेले असेल.

हे फीचर ऑपशनल असले तरी तुम्ही मेसेज ट्रांन्स्क्रीपशन करण्याचा निर्णय घेतला तर एका परमिशनची गरज असेल.

विशेष परवानगी द्यावी लागेल
रिपोर्टमधून समजते की, तुम्हाला तुमचा मेसेज ट्रांन्स्क्रीपशन करण्यासाठी अ‍ॅपला विशेष परवानगी द्यावी लागेल.
स्क्रीनशॉटवरून समजेल की, अ‍ॅपच्या आत एक स्पेशल ट्रांन्स्क्रीपशन सेक्शन असेल.
जिथे तुम्ही तुमचे व्हॉईस रेकॉर्डिंग पेस्ट करू शकता आणि ट्रांन्स्क्रीपशन फीचर सुरू करू शकता.

वारंवार व्हॉईस ट्रान्सक्राईबची आवश्यकता नाही
Wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की जे एखादा मेसेज पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्ट केला जातो,
तेव्हा त्याचे ट्रांन्स्क्रीपशन लोकल व्हॉट्सअप डेटाबेसमध्ये सेव्ह होतो.
यासाठी तुम्हाला वारंवार व्हॉईस ट्रान्सक्राईब करावा लागणार नाही,
कारण डिटेल्स आपोआप डेटाबेसमध्ये सेव्हा होतील.

Web Titel :- WhatsApp Voice Transcription | whatsapp voice transcription feature to roll out soon know what will change in app end to end encryption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन्पो लिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune News | काँग्रेसच्या माजी आमदाराची BJP वर टीका, मोहन जोशी म्हणाले – ‘मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश’