WhatsApp यूजर्ससाठी भेट ! लवकरच लॅपटॉप-कम्प्यूटरवर सुद्धा मिळणार ‘व्हॉइस’ आणि ‘व्हिडिओ’ कॉलची सुविधा
नवी दिल्ली : वृत्त संस्था – व्हॉट्सॲप यूजर्ससाठी फेस्टिव्ह सीझनमध्ये भेट मिळाली आहे. लवकरच वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फिचर मिळू शकते. एका नवीन रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप आपल्या वेब व्हर्जनमध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग आणण्यासाठी काम करत आहे. व्हॉट्सॲप वेब व्हर्जन 2.2043.7 मध्ये आलेल्या एका नव्या अपडेटनंतर हे फिचर पाहिले गेले होते. हे फिचर अजूनही बीटा फेजमध्ये आहे, असे समजते की, कंपनी पब्लिक रिलीजपूर्वी याची टेस्टींग करत आहे. व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल अगोदरच अँड्रॉइड आणि आयओएस अॅपमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ही सुविधा डेस्कटॉप व्हर्जनमध्ये मिळेल.
सुरू आहे टेस्टींग
व्हॉट्सॲप फिचरला ट्रॅक करणारे ट्विटर अकाऊंट डब्ल्यूए बेटा इन्फोच्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट अपडेटसह व्हॉट्सॲपचे डेस्कटॉप व्हर्जन 2.2043.7 मध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी सपोर्ट इंटिग्रेटेड आहे. याचे काही स्क्रीनशॉट सुद्धा शेयर केले आहेत.
बीटा अॅपमध्ये लेटेस्ट अपडेट लवकरच
या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अपडेटसह ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी अपडेट आले आहे. मात्र, हे फिचर टेस्टसाठी उपलब्ध नव्हते आणि ते लवकरच वेब व्हर्जनमध्ये अॅड केले जाईल. व्हॉट्सॲप वेब व्हर्जनवर अगोदरपासूनच मेसेंजरसाठी सपोर्ट उपलब्ध आहे. व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल ऑपशन येण्यासह एक्सप्रियन्स आणखी चांगला होईल.
आतापर्यंत फेसबुकच्या मालकीचे इन्स्टट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअपने या फिचरच्या बाबतीत कोणतीही माहिती शेयर केलेली नाही. मात्र, अपेक्षा आहे की बीटा अॅपमध्ये लेटेस्ट अपडेट आल्यानंतर ऑफिशल स्टेबल रिलीजसुद्धा येत्या काही दिवसात येईल.