WhatsApp चे नवीन फीचर ! द्वेष निर्माण करणारे अन् असभ्य-अश्लिल मेसेज पाठवणार्‍यांनी व्हावे सावध, अन्यथा कायमस्वरूपी बॅन

नवी दिल्ली : व्हॉट्सअप (WhatsApp) कडून दोन सिक्युरिटी फीचर्स अँड्राईड यूजर्ससाठी रोलआऊट (rolled out) करण्यात आले आहेत. यापैकी एक ‘व्हॉट्सअप मेसेज लेव्हल रिपोर्टिंग फीचर‘ (WhatsApp Message Level Reporting Feature) आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर हे फीचर व्हॉट्सअप (WhatsApp) वर असभ्य मेसेज (rude messages) पाठवणार्‍यांना लगाम लावण्यासाठी आणले आहे.

 

द्वेष पसरवणारे मेसेज वाढले (Hateful messages Increased)

मागील मोठ्या कालावधीपासून व्हॉट्सअप (WhatsApp) वर द्वेष पसरवणार्‍या (Hateful messages) आणि दंगली भडकवणार्‍या मेसेजची संख्या वाढत आहे. असे करणारे लोक सरकार आणि व्हॉट्सअपच्या नजरेआड आहेत.

 

मोदी सरकार व्हॉट्सअपकडे मागत आहे उत्तर

मोदी सरकार (Modi government) मोठ्या कालावधीपासून दंगल (riots) भडकावणे आणि असभ्य मेसेज पाठवणार्‍या यूजर्सची ओळख पटवण्यासाठी व्हॉट्सअप (WhatsApp) वर दबाव आणत आहे. परंतु व्हॉट्सअप एंड टू एंड एन्क्रिप्शन (end-to-end encryption) चा संदर्भ देत अशा लोकांची नावे उघड करत नाही.

 

ओळख पटवणे सोपे होईल

परंतु, व्हॉट्सअपचे नवीन फीचर आल्यानंतर अशा लोकांची ओळख पटवणे सोपे होईल. व्हॉट्सअपला नवीन आयटी अ‍ॅक्ट (new IT Act) अंतर्गत सुद्धा अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी बाध्य व्हावे लागते.

 

कसे काम करेल नवीन फीचर (How the new feature will work)

व्हॉट्सअपचे नवीन मेसेज लेव्हल रिपोर्टिंग फीचर (new message level reporting feature)
आल्यानंतर जर कुणी यूजर तुम्हाला असभ्य किंवा घाणेरडे मसेज पाठवत असेल,
तर तुम्ही अशा मेसेजला रिपोर्ट करू शकता. सोबतच तो मेसेज ब्लॉक करण्याचे ऑपशन सुद्धा मिळेल.
यासाठी मेसेजवर लाँग प्रेस करून त्यास रिपोर्ट आणि ब्लॉक करता येऊ शकते.

 

कायमस्वरूपी बंद होईल व्हॉट्सअप अकाऊंट

जर एखाद्या व्हॉट्सअप मेसेजवर 25 पेक्षा जास्त यूजर्सने रिपोर्ट केले असेल तर व्हॉट्सअप (WhatsApp) असे अकाऊंट बॅन करू शकते. सोबतच अशा लोकांचा रिपोर्ट सरकारसोबत सामायिक केला जाईल.

 

नवीन आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (social media platform) ला
सरकारसोबत प्रतिमहिना हिशेबाने रिपोर्ट द्यावा लागतो की, अखेर त्यांना किती तक्रारी मिळाल्या
आणि किती तक्रारींविरूद्ध अ‍ॅक्शन घेण्यात आली. यासाठी कुणाला ग्रुप किंवा पर्सनलवर
असभ्य व्हॉट्सअप (WhatsApp) मेसेज पाठवत असाल तर सावध व्हा, अन्यथा तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते.

 

Web Title :- WhatsApp | whatsapp message level reporting feature to curve hate speech and ugly messages

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा