
Whatsapp वर होईल बँकेचे सर्व काम, तुम्हाला पद्धत माहित आहे का? असे करा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp चा वापर तुम्ही चॅटिंगसाठी नक्कीच करत असाल, पण त्यावर इतरही अनेक करता येऊ शकतात. तुम्ही तुमच्या बँकेची सर्व महत्त्वाची कामे व्हॉट्सअॅपवर करू शकता. बहुतांश बँका व्हॉट्सअॅप बोट वापरण्याचा पर्याय देतात, परंतु अनेक यूजर्सना ते वापरण्याची पद्धत माहित नाही. (Whatsapp)
मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपवर अनेक बोट्स वापरण्याचा पर्याय यूजर्सला मिळतो. ते कोविड-१९ व्हॅक्सीन स्लॉट बुक करण्यापासून ऑनलाइन ऑर्डरचे स्टेटस तपासण्यापर्यंतची कामे करू शकते. त्याचप्रमाणे, व्हॉट्सअॅप बोटच्या मदतीने, तुम्ही अनेक बँकिंग कामे देखील करू शकता. याबाबत जाणून घेवूया.
SBI खातेधारकांना मिळतात या सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यूजर्सना त्यांच्या व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर नऊ बँकिंग सुविधा मिळत आहेत. त्यांची यादी खालील प्रमाणे…
१. अकाउंट बॅलन्स
२. मिनी स्टेटमेंट
३. पेन्शन स्लिप सर्विस
४. लोन प्रॉडक्टची माहिती
५. डिपॉझीट प्रॉडक्टची माहिती
६. एनआरआय सेवा
७. इन्स्टा अकाउंट उघडण्याची सुविधा
८. काँटॅक्ट/तक्रार निवारण हेल्पलाइन
९. प्री-अप्रूव्ड लोन संबंधी माहिती
व्हॉट्सअॅपवर बँकिंग सुरू करण्याची पद्धत
– सर्वप्रथम, एसबीआयच्या https://bank.sbi वेबसाइटला भेट द्या, जिथे WhatsApp बँकिंगसाठी नोंदणी कशी करायची हे कळेल.
– मोबाईल फोनच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन करा आणि या सेवेचा लाभ घ्या.
– बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून +९१९०२२६९०२२६ वर ‘हाय’ पाठवा.
– आता चॅटबोटने दिलेल्या सूचनांचे पालन करून बॅकअप घेण्यास सक्षम असाल.
SMS पाठवूनही करू शकता नोंदणी
– दुसरा पर्याय म्हणजे, WARG<>ACCOUNT NUMBER टाइप करून +९१७२०८९३३१४ वर एसएमएस पाठवू शकता.
– अशा प्रकारे तुमची WhatsApp बँकिंगसाठी नोंदणी केली जाईल आणि कन्फर्मेशन मेसेज मिळेल.
– एकदा नोंदणी केल्यानंतर +९१९०२२६९०२२६ वर ‘हाय’ पाठवा. आता WhatsApp बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकाल.
Web Title :- Whatsapp | whatsapp offers banking services this is how you can use sbi whatsapp platform
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update