WhatsApp चा दिवाळी धमाका ! कंपनीकडून 255 रुपये ‘कॅशबॅक’ची ऑफर, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था व्हॉट्सअ‍ॅप कडून या दिवाळीत (Diwali) ग्राहकांना WhatsApp Pay वर कॅशबॅक डील ऑफर दिली जात आहे. ही व्हॉट्सअ‍ॅप ची एक प्रमोशन ऑफर आहे, जिथे यूजर्सला WhatsApp च्या UPI बेस्ड पेमेंट सर्व्हिस (Payment Service) द्वारे व्यवहार केल्यास 51 रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरून एकुण 5 वेळच्या व्यवहारावर ग्राहकांना कमाल 255 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

 

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅप पे द्वारे केवळ 1 रुपयांचे किमान पेमेंट करावे लागेल. या बदल्यात तुम्हाला 51 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हे कॅशबॅक थेट बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येईल. यासाठी केवळ तुम्हाला बँक अकाऊंट व्हॉट्सअ‍ॅप पे सोबत लिंक करावे लागेल.

 

व्हॉट्सअ‍ॅप बीटा मोडमध्ये प्रमोशनल ऑफर उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅप अँड्राईड बीटा अ‍ॅपमध्ये चॅट विंडोच्या टॉपमध्ये पेमेंट ऑपशन दिले आहे. मात्र, यह प्रमोशनल ऑफर लिमिटेड अँड्रॉईड स्मार्टफोनवर उपलब्ध आहे.

 

कसे करायचे व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट

 

  • व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करा, टेक्स्ट एरियात रुपयाचे आयकॉन दिसेल.
  • रुपयाच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर Add your bank Account चे ऑपशन येईल.
  • यावर क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडीशन अ‍ॅक्सेप्ट करावे लागेल.
  • यानंतर बँक सिलेक्ट करा, जेथून बँकेचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर व्हेरिफाय करा.
  • अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅप UPI पेमेंटची प्रोसेस पूर्ण होईल.
  • यानंतर कोणत्याही मित्राला 1 रुपयाचे पेमेंट ट्रान्सफरसाठी इन्व्हाईट करू शकता.
  • व्हॉट्सअप UPI Pin सेटअप करण्याचा ऑपशन देते.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 52 वर्षाच्या शिक्षकानं 15 वर्षीय मुलीला नेलं टेरेसवर, बलात्कार करून अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस

Bhusaval-Daund Train | भुसावळ-दौंड मेमू साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

WhatsApp Facebook Meta | बदलले WhatsApp चे डिझाईन, आता दिसू लागले Facebook चे नवीन नाव Meta