WhatsApp च्या या जुन्या फीचरमध्ये होणार मोठा बदल, तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल वापर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – WhatsApp आपल्या यूजर्ससाठी एकापेक्षा एक फीचर सादर करत असते आणि आता WhatsApp आपल्या जुन्या फीचरमध्ये मोठा बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप इन-अ‍ॅप फीचर, ‘Delete for Everyone’ चे टाइम लिमिट वाढवण्यावर काम करत आहे. Delete for Everyone द्वारे मेसेज डिलीट होतो, जरी रिसिव्हरने तो डाऊनलोड केला असेल किंवा पाहिला असेल. या फीचरचा सर्वात जास्त वापर ते लोक करतात, जे चुकून एखादा यूजर किंवा ग्रुपमध्ये टेक्स्ट, फोटो, gif किंवा व्हिडिओ पाठवतात.

व्हॉट्सअप फीचर ट्रॅकर, WABetaInfo ने सांगितले आहे की, अँड्राईड बीटा v2.21.23.1 साठी व्हॉट्सअपमध्ये मिळालेल्या डिटेल्सनुसार, ‘Delete for Everyone’ फीचरचे टाइम लिमिट 4,096 सेकंदच्या कालमर्यादेपासून अनिश्चित काळापर्यंत वाढवले जाऊ शकते, जे 2018 मध्ये सादर केले होते.

Video साठी येत आहे नवीन फीचर

WABetaInfo च्या एका दुसर्‍या रिपोर्टमध्ये हे सुद्धा सांगण्यात आले आहे की,
iOS वर व्हॉट्सअपला एक नवीन व्हिडिओ प्लेबॅक इंटरफेस मिळत आहे.
हा यूसर्जला व्हिडिओ फुलस्क्रीनमध्ये पाहणे, किंवा पिक्चर-इन-पिक्चर विंडो बंद करण्याचे ऑपशन देईल.
अ‍ॅपच्या v2.21.220.15 वर काही iOS बीटा टेस्टर्सला कथित प्रकारे ही फंक्शनॅलिटी मिळण्यास सुरूवात झाली आहे.
हे मागील महिन्याच्या अखेरीस अँड्रॉईड डिव्हाईससाठी बीटा व्हर्जनमध्ये सादर केले होते.

याशिवाय, ट्रॅकरचा रिपोर्ट आहे की काही iOS बीटा टेस्टर WhatsAppमध्ये यूट्यूब व्हिडिओ पहाण्याच्या पद्धतीमध्ये बदल दिसू शकतो.
हा व्हिडिओ ऑटोमेटिक फुलस्क्रीन मोडमध्ये दिसेल.
हे सुद्धा नोट केले की, या फीचरवर सुद्धा काम सुरू आहे, यासाठी बीटा टेस्टर्स येईपर्यंत यास टेस्टिंग म्हणून दिले जाईल.
या आगामी फीचरसाठी रिलीज टाइमलाईनबाबत सुद्धा कोणतीही माहिती नाही.

Web Title : WhatsApp | whatsapp soon to give good news to users as it will extend delete for everyone time limit new feature coming up know how experience change

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा