ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

सावधान ! WhatsApp यूजर्स Hackers च्या जाळ्यात, आता असे लूटत आहेत पैसा, जाणून घ्या बचावाची पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही WhatsApp, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर तुम्ही धोक्यात आहात. सोशल मीडियावर मित्र आणि कुटुंबियांशी चर्चा करू शकता. परंतु येथे तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. हे हॅकर थेट अटॅक करत नाहीत, ते यूजर्सला वैयक्तिक माहिती (WhatsApp) देण्यास भाग पाडतात आणि यूजर्सचे पैसे चोरतात. सोशल मीडियावर सामान्यपणे एक मेसेज येतो जो एखादी भेट किंवा बक्षीस लागल्याचे सांगतो आणि एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते.

एका क्लिकने होऊ शकता कंगाल

या लिंकवर क्लिक करताच काही अ‍ॅप किंवा मालवेयर यूजर्सच्या फोन किंवा कम्प्युटरवर डाऊनलोड होतात. जे यूजरची हेरगिरी करणे आणि घोटाळेबाजांना माहिती पाठवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. यूजरची माहिती ते गुपचुप हॅकरला पाठवतात.

बनावट फॉर्म भरून घेऊन केली जाते फसवणूक

क्लिक केल्यानंतर यूसर्जला काही फॉर्म भरणे आणि यूजरनेम आणि पासवर्ड टाकण्यास सांगितले जाते. (WhatsApp) हा फॉर्म नकली असतो आणि सामान्यपणे बनावट वेबसाइटवर आढळतात, ज्यांना अशाप्रकारे डिझाईन केले जाते की, ते अधिकृत बँका आणि संस्थांप्रमाणे दिसावेत. सायबर गुन्हेगार (Cyber Crime) अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात लोकांना फसवत आहेत.

 

अशा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात न फसण्यासाठी यूजर्सने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, त्या कोणत्या ते जाणून घेवूयात…

1. जेव्हा कुणी मोठा फायदा करून देण्याचे आश्वासन देईल आणि पैसे मागत असेल तर समजा की हा घोटाळा आहे. लक्षात ठेवा काहीही मोफत मिळत नाही.

2. तुमच्याकडे कुणी यूजरनेम आणि पासवर्ड मागितला तर समजा हा घोटाळा आहे. कारण बँका, संस्था अशी माहिती मागत नाहीत.

3. क्रेडिट आणि डेबिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही, पिन, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी, इंटरनेट बँकिंग पासवर्ड कुणालाही शेयर करू नका.

4. कधीही तुम्हाला आलेला ओटीपी कुणालाही सांगू नका. कुणी ओटीपी मागितला तर समजा की हा घोटाळा आहे.

 

Web Title : WhatsApp | whatsapp users being targeted by fraudsters with clever online schemes here is how to stop it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Risod police | 3.45 कोटी रुपयांचा 11 क्विंटल गांजा जप्त, 4 जणांना अटक

Murbad police | बोलेरो पीक गाड्या चोरणारा चोरटा मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर 

Back to top button