WhatsApp युजर्सला मोठा झटका ! लवकरच ‘या’ 43 स्मार्टफोनवर नाही चालणार व्हॉट्सअ‍ॅप, तुमचा फोन तर यादीत समाविष्ट नाही ना?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) काही जुन्या स्मार्टफोनचा सपोर्ट 1 नोव्हेंबर पासून बंद करणार आहे. या झटपट मेसेंजरच्या माध्यमातुन वेळीच जुन्या डिव्हाइसेसचा सपोर्ट काढून घेतला जातोय. आता आगामी 2 महिन्यात आणखीन 43 जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सचा या यादीत समावेश करण्यात येईल. WhatsApp ने यंदा अनेक नवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये (WhatsApp) लिंक केलेत. अ‍ॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सला वगळण्यात आल्याची माहिती मिडियाच्या अहवालातुन पुढं आलीय.

 

कोणत्या फोन्समध्ये WhatsApp वापरता येणार?

व्हॉट्सअ‍ॅपच्या FAQ पेजनुसार अ‍ॅप पुढील स्मार्टफोन्सवर चालेल

अँड्रॉइड ओएस 4.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स

iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स

काही निवडक KaiOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स, ज्यात JioPhone आणि JioPhone 2 चा समावेश आहे.

43 साधन ज्यांच्यावर WhatsApp वापरता येणार नाही –

जर तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून वापरता येणार नाही:

Apple –

iPhone SE, 6S and 6S Plus.

Samsung –

Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core आणि Galaxy Ace 2.

LG –

LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact , Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD and 4X HD आणि Optimus F3Q.

ZTE –

ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 and Grand Memo.

Huawei –

Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, and Ascend D2.

Sony –

Sony Xperia Miro, Sony Xperia Neo L, Xperia Arc S.

अन्य –

Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, Wiko Darknight, Lenovo A820, UMi X2, Faea F1 आणि THL W8.

 

तुमचाफोन या यादीत असेल तर काय करावे?

समजा, तुमचा फोन या यादीमध्ये असेल तर तुम्हाला काही केल्या या फोनवर WhatsApp वापरता येणार नाही. एखादा नवीन स्मार्टफोन घेणे योग्य ठरेल. एकदा का WhatsApp ने सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री (Chat history) देखील तुम्हाला वापरता येणार नाही, अशी माहिती WhatsApp FAQ पेजवर आहे. मात्र, तुम्ही Email अटॅचमेंटच्या माध्यमातुन हिस्ट्री एक्स्पोर्ट (History Export) करू शकता.

Web Title : WhatsApp | whatsapp will stop working 43 smartphone models november yours list

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update