Whatsapp | ‘व्हॉट्सअ‍ॅप’ स्लो होतय का? मग करा लवकर ‘क्लीन’; जाणून घ्या सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  WhatsApp | देशात नाहीतर पुर्ण जगात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर अधिक केला जातो आहे. या मोबाईलमध्ये आता अनेक असे वेगवेगळे अ‍ॅप्स असतात. युजर्स त्याचा वापर जादा करत असतात. मात्र, काही काळानंतर (मर्यादीत) थोडं स्लो होण्यास सुरुवात होत असते. याचप्रमाणे सर्वांचे एक लोकप्रिय असणारे अ‍ॅप्स व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) देखील असंच काही काळानंतर स्लो काम करत असते. बहुतेक वेळा हँग देखील होत असते. असं होत असल्यास त्याला क्लीन (Clean) करणे आवश्यक आहे.

दरम्यान, अनेक वेळा युजर्सच्या स्मार्टफोनच्या (Smartphone) चॅटमध्ये फोटो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट्स, फाईल्स साठा (Store) असतात. या फाईल्स डिलीट न केल्याने ही समस्या वर येऊ शकते. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप क्लिन (WhatsApp Clean) करणे गरजेचे असते. कसॆ कराल क्लिन, जाणून घ्या.

आपल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘हे’ फीचर डिसेबल करा…

तुम्ही अ‍ॅपमधील एक फीचर बंद ठेवू शकता. ज्यामुळे स्पेसचा अधिक वापर होणार नाही. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया फाइल्सला ऑटो सेव्हचा पर्याय बंद करू शकता. यामुळे फक्त तुम्हाला हव्या असलेल्या मीडिया फाईल्सच फोनमध्ये सेव्ह करता येईल.

 

कसे कराल WhatsApp क्लिन?

सर्वप्रथम WhatsApp सुरु करून सेटिंग्समध्ये जा.

त्यानंतर डेटा आणि स्टोरेजवर टॅप करा.

आता खाली Storage Uses चा पर्याय दिसेल.

Storage Uses वर टॅप केल्यावर सर्व चॅट लिस्ट दिसेल.

येथे तुम्ही कोणत्या चॅटसाठी किती स्टोरेज यूज होत आहे ते पाहू शकता.

यानंतर ज्या चॅटमधील फाईल्स (Files) डिलीट करायच्या आहेत त्यावर टॅप करा.

आता फोटोसह सर्व लिस्ट तुमच्यासमोर असेल.

आता यातील तुमच्या कामाच्या नसलेल्या फाईल्स डिलीट करू शकता.

यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप क्लिन होईल व स्पेस देखील वाढेल.

 

Web Title : Whatsapp | whatsapp working slowly so step step process clean it now and ck it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jalna Crime | धक्कादायक ! जावयानं सासर्‍याला नदीपात्रात नेलं, दोघांच्या मदतीनं सपवलं; प्रचंड खळबळ

Modi Cabinet Decision | सिम कार्डपासून टॉवर उभारण्यापर्यंतचे नियम बदलणार, टेलीकॉम कंपन्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Defective Number Plate Fine | अलर्ट ! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर भरावा लागेल मोठा दंड, जाणून घ्या