WhatsAppवर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, तुमचं खातं होईल ‘बॅन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप हा प्रत्येक व्यक्तीच्या वापरातील आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल येणारी नवीन माहिती सर्वांना माहित असली पाहिजे. त्यात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर अनेक चांगल्या वाईट प्रवृत्तीसाठी केला जातो. त्यात व्हॉट्सअ‍ॅपचा नवीन फिचर आणि नियम आणले आहेत. त्यात व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अनेकांना एकदाच मॅसेस पाठविण्यासाठी, स्वयंचलित मॅसेज पाठवण्याबाबत नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. तसंच अशा लोकांचे अकाऊंट डिलिट केले जाईल, असं कंपनीने सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या नवीन फिचरने व्हॉट्सअ‍ॅपवरील भडकावू पोस्ट आणि गैरवर्तण करणाऱ्यांना चाप बसणार आहे. कोणी भडकाऊ किंवा भांडण लावू देणारे पोस्ट टाकत असतील तर ते सेवा नियमांचे उल्लंघन असेल, त्यामुळे या लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून काढून टाकण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या FAQ पेज ‘अधिकृत युजेस ऑफ व्हॉटसअ‍ॅप’ वर सांगितले होते की, कोणताही वापरकर्ता किंवा संस्था जी मोठ्या मॅसेज पाठवेल किंवा ऑटोमेटेड मॅसेज पाठवेल, त्यांच्यावर ७ डिसेंबर नंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. परंतू अद्याप अशा लोकांवर नेमकी काय कारवाई करणार हे कंपनीने स्पष्ट केले नाही.

आम्ही वैयक्तिक मॅसेज पाठवण्यासाटी हा प्लॅटफॉर्म तयार केला होता. मात्र व्हॉटसअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात मॅसेज पाठवविणे आणि त्याचा गैरवापर होत आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. व्हॉटसअ‍ॅपवर बल्क मॅसेज पाठवणाऱ्या कंपनी आणि व्यक्तीपैकी गेल्या तीन महिन्यांत २० लाख अकाऊंट डिलिट केले असल्याची माहितीही कंपनीने दिली.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

You might also like