Good News ! प्रायव्हसी पॉलिसी पासून WhatsApp ची माघार; 15 मे नंतरही सुरु राहणार अकाउंट
पोलीसनामा ऑनलाइन टीम – व्हॉट्स अँपने प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार १५ मे ही अंतिम मुदत दिली होती. मात्र या धोरणावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. त्यामुळे आता व्हॉट्स अँपने यु टर्न घेत प्रायव्हसी पॉलिसी धोरणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता १५ मे नंतरही यूजर्सचे अकाउंट सुरूच राहणार आहे. व्हॉट्स अँपने प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठी सुरुवातीला ८ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करत १५ मे अंतिम मुदत दिली. जर कोणी पॉलिसीचा स्वीकार केला नाही तर १५ मे नंतर यूजरचे व्हॉट्स अँपचे अकाउंट आपोआप निष्क्रिय होणार होते. मात्र आता या पॉलिसीमधून व्हॉट्स अँपने माघार घेतली आहे.
काय आहे प्रायव्हसी पॉलिसी
व्हॉट्स अँपचे यूजर्स व्हॉट्स अँपवर जो कन्टेन्ट अपलोड करतात, सबमिट अथवा सेंड वा रिसिव्ह करतात त्या सगळ्याचा वापर व्हॉट्स अँपची पॅरेंट कंपनी फेसबुक करू शकणार आहे. त्यामध्ये यूझर आयडी, डिव्हाइस आयडी, शॉपिंग हिस्ट्री, फोन नंबर, ई-मेल पत्ता, पेमेंट इन्फो, प्रॉडक्ट इंटरॅक्शन, यूझर कंटेंट इत्यादी माहिती व्हॉट्स अँपकडे शेअर होणार आहे. यामुळे यूझर्सच्या प्रायव्हसीवर गदा येणार आहे. त्यामुळे सर्च स्तरातून या या प्रायव्हसी पॉलिसीला विरोध होत आहे. दरम्यान, व्हॉट्स अँपने प्रायव्हसी पॉलिसीच्या अंतिम मुदतीपासून माघार घेतली असली तरी यूझरला पॉलिसीचा स्वीकार करण्यासाठीचा मेसेज वारंवार येत राहणार आहे. पॉलिसी स्वीकारण्यासाठी आग्रह धरला जाईल. जर तसे केले नाही तर अकाउंट डिलीट होईल, असे आधी सांगण्यात आले होते मात्र आता तसे होणार नाही.