1 फेब्रुवारी 2020 पासून स्मार्ट फोनमध्ये चालणार नाही WhatsApp

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या वॉट्सअ‍ॅपचा वापर सर्वचजण मोठ्या प्रमाणावर करतात. फोटो, व्हिडीओ, पासून ते व्हाईस मेसेज सुद्धा सोप्या पद्धतीने यावरून पाठवता येतात. नुकतेच वॉट्सअ‍ॅपने नुकतेच नवीन फिचर लॉंच केले होते. मात्र आता 1 फेब्रुवारी 2020 हे वॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस मध्ये वापरता येणार नाही.

Android आणि iOS साठी वापरता येणार नाही वॉट्सअ‍ॅप
वॉट्सअ‍ॅप 1 फेब्रुवारी 2020 पासून अँड्रॉइड 2.3.7 आणि आयओएस 7 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करू शकणार नाही.या आधीही वॉट्सअ‍ॅप चा सपोर्ट माइक्रोसॉफ्टसाठी बंद झाला होता. मात्र ही ऑप्रेटिंगसिस्टिम वापरणारे अनेक फोन आहेत.

KaiOS 2.5.1+ ऑपरेटिंग सिस्टमचा करावा लागेल वापर
वॉट्सअ‍ॅप ने सांगितले की आमचे वापरकर्ते  KaiOS 2.5.1+ या ऑपरेटिंग सिस्टम वर अ‍ॅपचा वापर करू शकणार आहेत. जियो फोन 1 आणि जियो फोन 2 मध्ये या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जात आहे. याव्यतिरिक्त युझर्स नुकत्याच लॉंच झालेल्या नोकिया 4 जी फोनचाही वापर करू शकतात. वॉट्सऍपने आपल्या यूजर्ससाठी फिंगरप्रिंट अनलॉक, प्राइवेट रिप्लाई आणि ग्रुप एडमिन सारखे फीचर्स लॉंच केले आहेत.

Visit : Policenama.com