WhatsApp वरील नको असलेले ग्रुप होणार उड़नछु 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपलया ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१८ साली व्हॉट्सॲपने युजर्स साठी नवे फीचर्स आणले होते. आता २०१९ मध्ये  व्हॉट्सॲप पुन्हा भन्नाट फीचर्स घेऊन येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता एक असे जबरदस्त फिचर आणले आहे. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर नको असलेल्या ग्रुपमध्ये तुम्हला सामील केले असेल आणि त्या ग्रुपच्या मेसेजेस मुळे तुम्ही  वैतागला असाल तर एका नव्या फीचरमुळे नको असलेल्या ग्रुप पासून तुमची कायमची  सुटका होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ‘ग्रुप इन्विटेशन’
व्हॉट्सअ‍ॅप ‘ग्रुप इन्विटेशन’ हे नवीन फीचर लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच ‘ग्रुप इन्विटेशन’ हे फीचर ‘Privacy’ सेक्शन मध्ये असणार आहे.

 या फीचरचा उपयोग कसा कराल
WhatsApp आयफोन युजर्स Settings > Account > Privacy > Groups मध्ये हे फीचर असणार आहे.
त्यानंतर Everyone, My contact, Nobody हे तीन पर्याय मिळतील.
तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता.
त्यानंतर WhatsApp युजर्स कोणत्याही ग्रुपमध्ये सामील होण्याआधी त्याचं इन्विटेशन पाठवणार आहे.
त्यानंतर युजर्स ते इन्विटेशन स्विकारायचं की नाही याबाबत विचार करू शकतात.
तसेच ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुम्हाला एक नोटीफिकेशन पाठवण्यात येईल.
त्या ‘ग्रुप इन्विटेशन’ चा विचार करण्यासाठी युजर्सकडे 72 तास असणार आहेत.

चॅटिंगची गंमत आणखी वाढणार
आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे, कारण इमोजीच्या लिस्टमध्ये २३० नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने २०१९ साठी नवीन २३० इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये ५९ नवीन इमोजीमध्ये १७१ व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.