WhatsApp वर येतंय जबरदस्त फिचर, फक्त एका क्लिकमध्ये Save होईल दुसर्‍या युजरचा नंबर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या लोकांनी सोशल मीडियाचा अधिक वापर करण्यास सुरवात केली आहे. मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे बऱ्याच काळापासून लोकांच्या पसंतीस उतरत आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप एक जबरदस्त फीचर घेऊन येणार आहे, म्हणून आता दुसर्‍याचा नंबर सेव्ह करण्यास तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. याला क्यूआर (QR) कोड स्कॅनिंग फीचर नाव दिले गेले आहे. यात क्यूआर कोड स्कॅन होताच दुसर्‍या वापरकर्त्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह होईल. यापूर्वी कंपनीने आपल्या व्हिडिओ कॉल फीचरमध्ये बदल केले होते.

अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यासाठी होत आहे तयार
WABeataInfo वेबसाइटनुसार, क्यूआर कोड स्कॅनिंग फीचर ला सर्वात आधी आयओएस (IOS) बीटासाठी सादर केले गेले होते. आता कंपनी त्यास अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यासाठी तयार करीत आहे. हे फीचर अ‍ॅपच्या 2.20.171 आवृत्तीमध्ये उपलब्ध असेल. या नवीन फीचरमध्ये सर्व वापरकर्त्यांना क्यूआर कोड मिळेल. जे आपण सेटिंग्जवर जाऊन शोधू शकता. याशिवाय तुम्हाला स्कॅनचा पर्यायही मिळेल. आपण दुसर्‍याचा क्यूआर कोड स्कॅन करताच त्याचा नंबर आपल्या संपर्क यादीमध्ये सेव्ह होईल.

दोन्ही वापरकर्त्यांकडे अपडेट आवृत्ती असणे आवश्यक आहे
अहवालानुसार, वापरकर्त्याला आपला नंबर कोणालाही सांगायचा नसल्यास त्याचा क्यूआर कोड रद्द होऊ शकतो. हे वैशिष्ट्य किती काळ सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल याबद्दल WABeataInfo ने माहिती दिली नाही. व्हॉट्सअ‍ॅप या फिचरवर वेगाने काम करीत आहे, अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत हे फीचर प्रत्येकासाठी येईल. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की हे फीचर वापरण्यासाठी दोन्ही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची अपडेट आवृत्ती असणे आवश्यक आहे.

व्हिडिओ कॉलमध्ये केला होता एक मोठा बदल
अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या व्हिडिओ कॉल फीचरमध्ये मोठा बदल केला होता. ज्यानंतर आता एकाच वेळी ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये 8 लोक जोडले जाऊ शकतात, पूर्वी फक्त 4 लोकांसह व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा होती. या वैशिष्ट्यानंतर घरून काम करणारे लोक व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे कार्यालयीन बैठक घेऊ शकतात. त्याचबरोबर कंपनी लवकरच आपल्या स्टेटस फीचर मध्ये बदल करू शकते. एका अहवालानुसार, वापरकर्ते पुन्हा 30 सेकंदांपर्यंतचे आपले स्टेटस ठेवण्यास सक्षम असतील.