WhatsApp वर नवे फिचर,आता कळणार तुम्ही सर्वात जास्त कोणाशी करता चॅटिंग?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईटस पैकी व्हॉट्सअ‍ॅप च्या लोकप्रियतेने शिखर गाठले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ने मागील वर्षीपासून स्टेट्स स्टोरी ठेवण्यासाठी नवीन फिचर चालू केले. या फीचरची देखील भन्नाट चलती आहे. सोशल नेटवर्कींग साईटमधील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर रोज लोक हजारो प्रकारच्या स्टोरीज शेअर करत असतात. या फीचरमध्ये आपण कुठलीही स्टोरी २४ तासासाठी ठेऊ शकतो. ३० सेकंदापर्यंतचा एखादा व्हिडीओ आपण स्टेटस स्टोरी म्हणून ठेऊ शकतो. ह्याच व्हॉट्सअ‍ॅप च्या स्टेट्स फीचरमध्ये आता लवकरच नवा बदल होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच ‘Ranking’ नावाचं एक नवीन फिचर लाँच करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप Status चं Ranking फिचर

नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप Status चं Ranking बदलणार आहे. या संदर्भात माहिती WABetaInfo ने दिली आहे. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपवर आपण ऑनलाईन असताना सर्वात जास्त ज्या कॉन्टॅक्टसोबत चॅट करतो त्यांचं Status सर्वात आधी दिसणार आहे. त्यानुसार Status चा क्रम ठरवण्यात येणार आहे. तसेच Ranking ठरवताना अन्य काही गोष्टींचा देखील आवर्जून विचार केला जाणार आहे.

असे केले जाणार Ranking

– सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप युजर एका दिवसात कोणाकोणाशी किती संवाद साधतो यावरून तीन भागात त्याचे Ranking करण्यात येणार आहे.

– एखादा मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला तर – Normal Ranking , फोटो, व्हिडीओ पाठवले अथवा रिसीव्ह केल्यास – Good Ranking, युजरने एखादा मेसेज इग्नोर केल्यास – Bad Ranking असणार आहे.

– व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कॉल केल्यास त्याचं Ranking ठरवण्यात येणार आहे.

– ग्रुपमध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या मेसेजला जास्तीत जास्त रिप्लाय दिल्यास त्याचा विचार ही Ranking ठरवताना केला जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वर तुम्ही कोणाशी करता सर्वात जास्त चॅटिंग ? माहित करून घ्या या पद्धतीने

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण अनेकांशी गप्पा मारत असतो. मात्र यामध्ये आपण कोणत्या व्यक्तीशी अथवा ग्रुपमध्ये सर्वात जास्त संवाद साधतो हे आता समजणे अधिक सोपे होणार आहे.

आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यानंतर डिस्प्लेवर सर्वात वर तीन डॉट दिसतात त्यावर क्लिक करा. आयफोनचा वापर करत असाल तर होम पेजवर खाली दिलेल्या सेटींग पर्यायावर डबल टॅप करून सेटींगमध्ये जा. सेटींगमध्ये जाऊन डेटा अँड स्टोरेज यूजेस या पर्यायावर क्लिक करा. चॅट आणि डेटा यूजेसवर आधारित ग्रुप्स आणि कॉन्टॅक्सची एक लिस्ट मिळेल. त्यामध्ये सर्वाधिक चॅट केलेल्या व्यक्तीची माहिती मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण सर्वाधिक गोष्टी शेअर केलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी अथवा ग्रुपविषयी येथे माहिती मिळते.