‘WhatsApp’ लवकरच आणणार ‘हे’ खास ‘फिचर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्स अ‍ॅपने नुकताच अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅप, बायोमेट्रिक अनलॉक फिचर अ‍ॅड केले होते. यांनंतर हेच फिचर ios बीटा यूजर्ससाठी कंपनीने तीन महिन्याआधी लॉन्च केले होते. आता कंपनीने ios यूजर्ससाठी नवीन बीटा अपडेट आणले आहे.

क्रिएट करा animoji –
या नव्या अपडेटमध्ये memoji स्टिकर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. wabetainfo च्या माहितीनुसार फिचरमध्ये पुढील ios 2.19.90 ऑफिशिअल अपडेटमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. म्हणजेच नवे फिचर आल्याने अ‍ॅपल आयफोन यूजर्सला memoji किंवा पर्सन्लाइज्ड animoji क्रिएट करुन शेअर करता येईल. यानंतर यूजर्स आपल्या मित्रमंडळींना आणि कुटूंबियांना memoji ला फक्त imessege च्या माध्यामातून पाठवू शकतील. अजून हे लोकप्रिय फिचर सादर करण्यात आले नाही.

हे यूजर्स वापरु शकणार फिचर –
व्हॉट्स अ‍ॅप नव्या फिचरवर काम करत आहे. ज्यामुळे आयफोन x किंवा त्यापुढील मॉडेल यूज करणारे यूजर्स memoji शेअर करु शकतील. हे फिचर आल्यावर व्हॉट्सअ‍ॅप यूजर व्हिडिओ, gif, emoji च शेअर करु शकणार नाही तर memoji या नव्या फिचरचा लाभ घेऊ शकतील.

हे खास फिचर अजून उपलब्ध करुन दिलेले नाही परंतू लवकरच memoji शेअरिंग पर्याय उपल्बध होईल. याशिवाय व्हॉट्स अ‍ॅपकडून ग्रुपवर स्टीकर आणि अलबमच्या सपोर्ट देण्याची तयारी देखील करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like