‘या’ नव्या नियमांमुळे भारतात व्हॉटस्‌ॲप सेवा होणार बंद ? 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेले काही नियम लागू करण्यात आले तर भारतातील व्हॉट्सअपची सेवा बंद होण्याची शक्यता आहे. व्हॉटस्‌ॲप कंपीनचे वरिष्ठ अधिकारी कार्ल वूग बुधवारी दिल्‍लीत आयोजित करण्यात आलेल्‍या मीडिया कार्यशाळेत याबाबत माहिती दिली आहे. वूग हे अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळत त्‍यांचे प्रवक्‍ते होते.
कार्ल वूग यांनी दिलेल्या माहितीनुसार,’ भारतात व्हॉट्सअपचे २० कोटी यूजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभर एकूण १.५ अब्ज यूजर्स आहेत. मेसेजेसचा माग घेणे म्हणजेच त्याच्या स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला असून तोच चिंतेचा विषय आहे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉटस्‌ॲप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. म्‍हणजेच मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करणारा या दोघांनाच तो वाचता येणार आहे. व्हॉटस्‌ॲपलाही तो मेसेज वाचता येणार नाही.’
वूग यांनी नवे नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता फेटाळली नाही.जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे, प्रस्तावित नियम लागू होत आहेत परंतु, ते मजबूत गोपनीयतेच्या सुरक्षेच्या अनुरुप नाहीत. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो. पण नव्या नियमानुसार आम्हाला आमच्या उत्पादनाची पुर्नबांधणी करावी लागेल. अशा स्थितीत संदेश सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही.
 एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचर-
एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमाअंतर्गत त्याच्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल.