फेक न्यूज थांबविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेक न्यूज, फोटो आणि मेसेजेस व खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपने महत्वाचे पाऊल उचलले असून त्यासाठी चेकपॉईंट टिपलाईन लाँच् केले आहे. या चेकपॉईंट टिपलाईनच्या मदतीने युजर्सना त्यांना मिळालेले मेसेज अथवा माहिती खरी आहे की खोटी याबाबत खात्री करुन घेता येणार आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या काळात खोट्या बातम्या आणि माहिती मोठ्या प्रमाणावर पसरवली जात आहे. त्या खऱ्या आहेत की नाही याची खात्री करण्याचे कोणतेच साधन नव्हते. त्याची खात्री करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकने भारतातल्या स्किलिंग स्टार्टअप प्रोटो ने टिपलाईन लाँच केले आहे. या टिपलाईनद्वारे एक डेटाबेस तयार केला जाईल. या द्वारे निवडणुकांदरम्यान फेक न्यूज आणि माहितीचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे खोट्या माहितीचा प्रसार थांबवणे व्हॉट्सअ‍ॅपला सोपे जाणार आहे.

फेसबुकने नुकतीच खोटे मेसेज व्हायरल केल्याबद्दल काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेस हटविली. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअ‍ॅपवर खोटी माहिती प्रसार केलेले अकाऊंट थांबविणे शक्य होणार आहे.