‘कबीर सिंह’ फेम कियारा अडवाणीने अशी केली गुंडांची ‘धुलाई’

लखनऊ : वृत्तसंस्था – शहिद कपूरसोबत कबीर सिंह या चित्रपटात काम करणाऱ्या कियारा अडवाणी हिने प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या ती इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असून सध्या तिच्याकडे पाच चित्रपट आहे. कियारा तिच्या आगामी इंदू की जवानी या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लखनऊमध्ये आली होती. त्यावेळी ती गुंडांना मारहाण करतान दिसली.

किरायाच्या इंदू की जवानी या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊच्या गोमती नगर येथील मॉलमध्ये सुरु आहे. चित्रपटाच्या एका दृष्यात तिला मॉलमध्ये खरेदी करताना आणि नंतर गुंडाच्या छेडछाडीचा बळी पडताना दाखवले आहे. तसेच तिला या गुंडांची भीती वाटण्याऐवजी ती त्या गुंडांची चांगलीच पिटाई करते असे दाखवण्यात आले आहे. यानंतर चित्रीकरण संपते.

कियाराचे चित्रिकरण पाहण्यासाठी तिच्या हजारो चाहत्यांनी यावेळी मॉलजवळ गर्दी केली होती. चित्रिकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी इंदू की जवानी चित्रपटात एका डेटिंग अ‍ॅपचा वापर करणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात तिला अनेक विचित्र परिस्तितीला सामोरे जावे लागते.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like