जेव्हा ऐश्वर्यानं विचारला प्रश्न तेव्हा नजरेला नजरही मिळवू शकला नाही ‘भाईजान’ सलमान ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लव लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे. सध्या एक इंस्ट्रेस्टिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, एकमेकांचं नाव ऐकणंही सलमान आणि ऐश्वर्यासाठी उप्स मुमेंटपेक्षा कमी नाहीये.

एक व्हिडीओ समोर आला आहे जो सलमानच्या एका सिनेमाच्या प्रमोशनच्या इव्हेंटचा आहे असं सांगितलं जात आहे. यावेळी ऐश्वर्या त्याला प्रश्न विचारत आहे. ही ऐश्वर्या म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या रॉय नाही तर महिला पत्रकार ऐश्वर्या आहे. जेव्हा ऐश्वर्या सलमानला काही प्रश्न विचारते आणि जेव्हा ती तिचं नाव सांगते तेव्हा मात्र सलमान खानच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून जातात. तो काहीतरी विचित्र रिअॅक्ट करताना दिसत आहे.

इतकंच नाही तर तो आधी इकडे तिकडे पहात टाळण्याचा प्रयत्नही करतो. यावेळी ती महिला पत्रकार त्याला तिच्याकडे पाहण्याची विनंती करते. परंतु सलमान काहीसा संकोच करताना दिसत आहे. सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु आता लॉकडाऊनमुळं हे शक्य होईल असं काही वाटत नाही.